विधान परिषदेवर उर्मिला मातोंडकर, पक्षनिष्ठ पतिव्रता कोपऱ्यात बसून रडत आहे


urmila matondkar news पक्षनिष्ठ पतिव्रता कोपऱ्या बसून रडत आहे, नवी भटकभवानी मात्र विमानातून उडत आहे, असे ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी म्हटले होते. त्याचे प्रत्यंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना येत आहे, म्हटले तर वावगे ठरणार नाही. विधान परिषदेच्या राज्यपाल नामनिर्देशित १२ जागांसाठी पक्षनिष्ठांना सोडून इतरच नावे पुढे येत आहेत. विशेष म्हणजे कॉंग्रेसकडून गेल्या वेळी लोकसभा निवडणूक लढविणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (urmila matondkar news) यांना शिवसेनेच्या कोट्यातून आमदारकी दिली जाण्याची चर्चा आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई: पक्षनिष्ठ पतिव्रता कोपऱ्यात बसून रडत आहे, नवी भटकभवानी मात्र विमानातून उडत आहे, असे ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी म्हटले होते. त्याचे प्रत्यंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना येत आहे, म्हटले तर वावगे ठरणार नाही. विधान परिषदेच्या राज्यपाल नामनिर्देशित १२ जागांसाठी पक्षनिष्ठांना सोडून इतरच नावे पुढे येत आहेत. (urmila matondkar news)

विशेष म्हणजे कॉंग्रेसकडून गेल्या वेळी लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या कोट्यातून आमदारकी दिली जाण्याची चर्चा आहे.

राज्यसभेवर कार्यकर्त्यांना सोडून धनाढ्यांना संधी द्यायची शिवसेनेची परंपरा आहे. मात्र, आता विधान परिषदेवरही पक्षाच्या कार्यकर्त्यांना डावलण्याची नवी परंपरा सुरू असल्याचे शिवसेनेचे कार्यकर्ते बोलू लागले आहेत. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाच्या विरोधात निवडणूक लढविली होती.

यावेळी शिवसेनेवर कडक शब्दांत टीका करत गुंडगिरीचा आरोपही केला होता. मात्र, कॉंग्रेसवर नाराज असलेल्या मातोंडकर यांना आता शिवसेना आपल्या पक्षाच्या कोट्यातून उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. उर्मिला मातोंडकर यांची विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त जागेवर शिवसेनेकडून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. उर्मिला यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर शिवसेनेशी त्यांची जवळीक वाढली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन चर्चा केल्याने शिवसेनेकडून उर्मिला यांची विधीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे संसदेत जाता-जाता राहिलेल्या उर्मिला विधीमंडळात प्रवेश करणार का, याची उत्सुकता आहे.

urmila matondkar news

कॉंग्रेसतर्फे नसीम खान, सचिन सावंत, मोहन जोशी, सत्यजित तांबे, आशिष देशमुख, चारुलता टोकस, रजनी पाटील ही नावं चर्चेत आहेत. ऐनवेळी उर्मिला मातोंडकर यांचे नाव चर्चेत आल्याने मात्र या वेळी तरी कॉंग्रेस सचिन सावंत यांच्या सारख्या तडफदार प्रवक्त्याला संधी मिळणार का हा प्रश्न उपस्थित होईल.

शिवसेनेतर्फे सुनील शिंदे, आदेश बांदेकर, सचिन अहिर, शिवाजीराव आढळराव-पाटील, वरुण सरदेसाई यांच्यासोबत राहुल कनाल या युवा सेना पदाधिकाऱ्याचे नाव देखील चर्चेत आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे एकनाथ खडसे, शिवाजी गर्जे, आदिती नलावडे, सूरज चव्हाण, राजू शेट्टी, आनंद शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. (urmila matondkar news)

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी तयार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर उद्या ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली जाणार असल्याची माहिती आहे. देशात एकूण ७ राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे. कला, वाडमय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती