UPSC Recruitment 2021: लेखी परीक्षेविना थेट संयुक्त सचिवपदासाठी भरती ; आजच करा अर्ज

  • केंद्रीय लोकसेवा आयोग ( UPSC ) वेगवेगळ्या पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. UPSC Recruitment 2021 : Recruitment for the post of Joint Secretary directly without written examination; Apply today

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( UPSC ) वेगवेगळ्या पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. युपीएससीच्या माध्यमातून मंत्रालयातील महत्वाच्या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. आज सोमवारी या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या पदांसाठी परीक्षा होणार नसून थेट मुलाखतीतून पदांवर भरती होणार आहे.मंत्रालयातील कृषी आणि किसान मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, अर्थ मंत्रालय, नागरी उड्डाण मंत्रालय, जलशक्ती मंत्रालय, कायदा आणि न्याय मंत्रालय, रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय आदी विभागात ही पदे भरली जाणार आहेत. विविध मंत्रालयात 29 पदांसाठी संयुक्त सचिव पदासाठी भरती होणार आहे.

अर्जदारांना https://www.upsconline.nic.in/ वर अर्ज करता येणार आहे.

योग्यता Eligibility criteria

अर्जदाराकडे संबधित पदाशी निगडीत पदवी असायला हवी. काही पदांसाठी पदवीत्तर पदवी असायला हवी. संबधित क्षेत्रात 10 वर्षे कामाचा अनुभव हवा.

वय (age limit)

अर्जदारांचे वय जास्तीत जास्त 55 वर्षे इतके असायला हवे. आरक्षणाच्या कॅटेगरीनुसार शासकीय नियमांनुसार सूट देण्यात आली आहे. युपीएससीने जाहीरातीत दिलेल्या पदांवर नियुक्ती झाल्यास 2 लाखांपर्यंत मानधन मिळू शकेल.

UPSC Recruitment 2021 : Recruitment for the post of Joint Secretary directly without written examination; Apply today

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*