यूपीतल्या कुख्यात बाहुबली मुख्तार अन्सारीला यूपी पोलिसांच्या ताब्यात देण्यास पंजाब पोलिसांना नकार; काँग्रेसचे अमरिंदर सरकार का वाचवेतय मुख्तारला?; मुख्तारच्या परिवारालाही त्याच्या एन्काउंटरची भीती


वृत्तसंस्था

रोपड (पंजाब) : उत्तर प्रदेशातील पूर्वांचलमधला बाहुबली माफिया आमदार मुख्तार अन्सारीला यूपी पोलिसांच्या ताब्यात देण्यास पंजाब पोलिसांनी दुसऱ्यांदा नकार दिला आहे. मुख्यात अन्सारीच्या कुटुंबीयांनी त्याच्या एन्काउंटरची भीती व्यक्त केली आहे. परंतु, सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतरही पंजाब पोलिसांनी मुख्तारचा ताबा यूपी पोलिसांना देण्यास नकार दिला आहे. सुप्रिम कोर्टाला आम्ही उत्तर देऊ असे सांगून रोपड पोलिसांनी यूपीतला गाझीपूर पोलिसांना परत पाठविले आहे. UP notorious Bahubali Mukhtar Ansari in police custody

मुख्तार अन्सारी यूपीतल्या पूर्वांचलचा बाहुबली आमदार आहे. सध्या तो बहुजन समाज पक्षाचा आमदार आहे. पण अनेक हत्यांसह, दरोडे, दहशतवादी कृत्ये यांसह अनेक गुन्ह्यांखाली त्याच्यावर खटले चालू आहेत. काहींमध्ये त्याला शिक्षा झाली आहे.


उत्तर प्रदेशात बदायूँमध्ये अंगणवाडी सेविकेवर नृशंस बलात्कार, दोघांना अटक; पोलिस अधिकारी निलंबित


उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने राज्यातील गुंडगिरी मोडून काढण्याच्या मोहिमेत अनेक माफिया, गुंडांना गारद केले. तसेच मुख्तार अन्सारीच्या हॉटेल, ऑफिसेस यांच्यासह मोठमोठ्या बेकायदा मालमत्ता उध्दवस्त केल्या आहेत. त्याचे दादागिरीचे आणि माफियाखोरीचे साम्राज्य मोडून काढले आहे. त्याला आता स्वतःच्या एन्काउंटरची भीती सतावते आहे. यूपी पोलिसांनी बाबू बजरंगीसमवेत अनेक गुंडाचा एन्काउंटर केल्याचे मुख्तारने आणि त्याच्या परिवाराने पाहिले आहे.

सध्या तो पंजाबच्या रोपड जेलमध्ये बंद आहे. तो आजारी असल्याचे आणि प्रवास करण्याच्या स्थितीत नसल्याचे सांगून पंजाब पोलिसांनी यूपी पोलिसांकडे त्याचा ताबा देण्यास नकार दिला आहे. एक प्रकारे पंजाबचे काँग्रेस सरकार त्याला राजकीय आश्रय देत असल्याचा यातून आरोप होतो आहे. मुख्तारच्या परिवाराचाही त्याला पंजाबमधून उत्तर प्रदेशातील जेलमध्ये हलविण्यास विरोध आहे. कारण त्यांना मुख्तार यूपीतील जेलमध्ये “सुरक्षित” राहू शकेल, याची खात्री वाटत नाही.

मुख्तारचा ताबा यूपी पोलिसांना द्यावा, असे स्पष्ट आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहेत. ते घेऊन ऑक्टोबर २०२० मध्ये यूपी पोलिस पंजाबमध्ये त्याचा ताबा घेण्यासाठी गेले होते. तेव्हाही पंजाब पोलिसांनी त्याला यूपी पोलिसांच्या ताब्यात देण्यास नकार दिला होता. आज परत यूपी पोलिस नवा आदेश घेऊन गेल्यावरही मुख्तारला यूपी पोलिसांच्या ताब्यात देण्यास पंजाब पोलिसांनी नकार देत आम्ही सुप्रिम कोर्टात उत्तर देऊ असे म्हटले आहे.

UP notorious Bahubali Mukhtar Ansari in police custody

यातून मुख्तार सारख्या एकेकाळी गुंडगिरी, दहशतीचे साम्राज्य चालविणाऱ्या माफियाला यूपी पोलिसांची किती भीती वाटते आहे, हेच स्पष्ट होते आहे. त्याच बरोबर मुख्तारसारख्या माफियाला वाचविणारे पंजाबचे काँग्रेस सरकार आणि उत्तर प्रदेशातील भाजपचे योगी सरकार यांच्यातील राजकीय संघर्षही स्पष्ट झाला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती