ढाई अक्षर प्रेम के व्यक्त करण्यासाठी कोल्हापुरात पठ्ठ्याने रंगवला ‘ ढाई ‘ किमीचा रस्ता , रस्त्यावर ‘I love U’ चा संदेश ; होऊ द्या चर्चा…

  • कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती या गावापासून जयसिंगपूर शहरापर्यंत अडीच किलोमीटरचा मार्ग सध्या चर्चेत आहे.
  • डिजिटल युगात प्रेम व्यक्त करण्यासाठी या पठ्ठ्याने निवडलेला हा ‘ मार्ग ‘ म्हणजे जोरदार चर्चाच चर्चा

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : पुण्यातील एका प्रियकराची पोस्टरबाजी चांगलीच रंगली होती. या प्रियकराने त्याच्या शिवडे नावाच्या प्रेयसीचं नाव घेत आपलं प्रेम व्यक्त केलं होतं. तेव्हा पुण्यात ठिकठिकाणी तशाप्रकारचे फ्लेक्स लावण्यात आले होते. त्यानंतरही तशाचप्रकारचे आणखी काही फ्लेक्स पुण्यातील नागरिकांना दिसते होते. पुण्यापाठोपाठ आता कोल्हापुरात एका प्रियकराने आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. या प्रियकराने थेट डांबरी रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या ऑईलपेंटने I love you आणि I miss you असं लिहिलं आहे  .Unknown person wrote I love you on road in kolhapur

 

‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं,’ याची प्रचिती कधी येईल ते सांगता येत नाही. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या अशाच एका प्रेमवीराची जोरदार चर्चा सुरू आहे.शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती या गावापासून जयसिंगपूर शहरापर्यंत अडीच किलोमीटरचा मार्ग सध्या चर्चेत आहे.

धरणगुत्ती या गावातल्या एका प्रेमवीराने या रस्त्यावर चक्क ‘आय लव्ह यू’ आणि ‘आय मिस यू’ असं ऑइल पेंटने लिहिलं आहे. मग काय या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू झाली असून हा प्रेमवीर नक्की कोण आहे, याबाबत कयास केला जात आहे. सदर तरुणाची प्रेयसी कदाचित याच रस्त्याने दररोज कॉलेजला जयसिंगपूरला जात असेल असा अंदाज बांधला जात आहे.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

जयसिंगपूर धरणगुत्ती हा 6 ते 7 किमीचा रस्ता आहे. गावाच्या तीन किमी अलिकडे ‘आय लव यु’ आणि ‘आय मिस यु’ लिखानाची सुरूवात झाली आहे. तर गाव संपन्याच्या अर्धा किमी आधी हे लिखान थांबवलेलं आहे. ज्या ठिकाणी रस्त्यावर दोन ते तीन बाह्यवळणे आहेत तिथून प्रवास करताना रस्त्यावर लिहिलेले शब्दे पाहून सर्वच नागरिक अचंबित होत आहेत. अनेकजण याचा फोटो काढून सोशल मिडीयावर टाकत आहे. शिवाय कोण आहे हा प्रियकर याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Unknown person wrote I love you on road in kolhapur

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*