कोरोनावर मात करण्यासाठी टांझानियात सार्वत्रिक औषधीयुक्त वाफ केंद्राचा वापर

वृत्तसंस्था 

डोलोमा : पूर्व आफ्रिका खंडातील टांझानिया या देशात कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी सार्वत्रिक वाफ घेण्याची केंद्रे उभारली आहेत. या केंद्रात पाण्यात विविध आयुर्वेदिक वनस्पती टाकून त्याची वाफ तयार केली जाते आणि सामूहिकरीत्या नागरिकांना देण्यात येत आहे. universal medicinal vapor center in Tanzania to overcome corona

कोरोनाचे संकट वाढत आहे. प्रबळ औषध नाही. लस आली आहे. परंतु सध्या तरी स्वतःची काळजी हाच एक उपाय आहे. त्यामुळे टांझानियात सार्वत्रिक वाफ घेण्याची केंद्र उभारण्यात आले आहे.एका मोठ्या चौकोनी केंद्रात सात ते आठ माणसे उभी राहू शकतील, अशी व्यवस्था केली आहे. त्या केंद्राच्या पाठीमागे दोन मोठ्या भांड्यात पाणी टाकले जाते.त्या पाण्यात कडुनिंब, गवती चहा, लिंबू, आले आदी वनऔषधी टाकल्या जातात. त्यानंतर ही वाफ मोठ्या नळ्यांतून केंद्रात सोडली जाते.

नागरिक या केंद्रात जातात. काही मिनिटे आत राहतात. केंद्रातील वाफ घेऊन बाहेर पडतात. कडुनिंब, लिंबू आणि आल्यात विषाणूविरोधी गुणधर्म आहेत. या वाफेमुळे अंगात मुरलेला ताप बाहेर काढण्याची क्षमता असते. तसेच कोरोनाचा नायनाट तो करतो, असा दावा केला आहे.

कोरोना विषाणू या औषधीयुक्त वाफेसमोर टिकाव धरू शकत नसल्याचा दावाही केला आहे. एकंदरीत हा उपाय एक पारंपरिक पर्याय म्हणून या देशात वापरला जात आहे.

आजपर्यंत केवळ 21 जणांचा मृत्यू

टांझानिया या देशाने आधुनिक औषध पद्धतीचा त्याग करून पारंपरिक औषधांचा वापर केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जानेवारीपासून आजअखेर एकाही नव्या प्रकरणाची नोंद झाली नाही. 509 जणांना कोरोना झाल्याचे आणि 21 जणांचा मृत्यू झाल्याचे म्हंटले आहे.

universal medicinal vapor center in Tanzania to overcome corona

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*