दिल्लीतील हिंसक शेतकरी आंदोलकांच्या समर्थनासाठी अमेरिकेत खलिस्तानी समर्थक उतरले रस्त्यावर


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन / नवी दिल्ली : हिंसक आंदोलनासाठी शेतकऱ्यांना भडकावून देऊन भारतातले शेतकरी नेते कायदेशीर कारवाईच्या भीतीने दिल्ली बॉर्डरवरून गायब झालेत आणि तिकडे अमेरिकेत खलिस्तानी समर्थक दिल्लीतील हिंसक आंदोलनाचे समर्थन करण्यासाठी रस्त्यावर उतरलेत. शेतकरी आंदोलनातला हा हिंसक हिडीस चेहरा समोर आला आहे. United States: Khalistan supporters held a protest outside the Indian embassy in Washington DC in support of protest against farm laws in India.

दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर मोर्चातील शेतकऱ्यांनी हल्ले करून ८३ पोलिसांना जखमी केले तर ८ बसगाड्या आणि १७ खासगी वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली बॉर्डरसह दिल्ली शहरात देखील ठिकठिकाणी झालेल्या हिंसाचारप्रकरणी आणखीही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. आणि या आंदोलनाच्या समर्थनासाठी अमेरिकेतील वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासासमोर खलिस्तानी समर्थक हातात खलिस्तानचे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरलेत.दिल्लीत निमलष्करी दलाच्या १५ तुकड्या तैनात करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला आहे. दिल्लीतील हिंसाचाराची आग शमविण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे तर शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने खलिस्तानचे समर्थन करण्याचा काही फुटीरतावादी शक्तींचा डाव वॉशिंग्टनमधील खलिस्तानी समर्थक आंदोलनावरून उघडा पडला आहे.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, पूर्व दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या तोडफोडप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये आठ बस आणि १७ खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच आंदोलक शेतकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात ८३ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

United States: Khalistan supporters held a protest outside the Indian embassy in Washington DC in support of protest against farm laws in India.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती