Union Minister Prakash Javadekar Criticizes Maharashtra government in Rajyasabha

मविआच्या कारभारावरून संसदेत रणकंदन, जावडेकर म्हणाले- ‘गृहमंत्री वसुली करतात, अख्ख्या देशाने पाहिले’

महाराष्ट्र सरकारच्या वसुली प्रकरणाची चर्चा आता देशाच्या संसदेत सुरू आहे. सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीवरून गदारोळ झाला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे गृहमंत्री वसुली करतात, हे अख्खा देश पाहत आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारच्या वसुली प्रकरणाची चर्चा आता देशाच्या संसदेत सुरू आहे. सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीवरून गदारोळ झाला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे गृहमंत्री वसुली करतात, हे अख्खा देश पाहत आहे.

प्रकाश जावडेकरांचे ट्वीट

प्रकाश जावडे यांनी याप्रकरणावर ट्वीट करत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये जावडेकरांनी लिहिले की, काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेना म्हणतेय की, महाराष्ट्रात सरकारला कोणताही धोका नाही. पण महाराष्ट्राला मात्र महाविकास आघाडी सरकारपासून धोका आहे.

तथापि, गदारोळानंतर अध्यक्षांनी स्पष्ट केले की, यातील काहीही रेकॉर्डमध्ये जाणार नाही. महाराष्ट्रावरून झालेल्या गदारोळानंतर राज्यसभा दुपारी अडीचपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. केवळ राज्यसभाच नाही, तर लोकसभेतही या विषयावर गदारोळ झाला. भारतीय जनता पक्षाचे खासदार राकेश सिंह म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि केंद्रीय एजन्सींनी या प्रकरणाची चौकशी करावी. राकेश सिंह म्हणाले की, एपीआयच्या समर्थनार्थ एखाद्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेण्याची पहिलीच वेळ आहे. त्याच एपीआयला 100 कोटी रुपये वसुली करण्याचे टारगेट देण्यात आले होते.

लोकसभेत, शिवसेनेचे विनायक राऊत यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत म्हटले की, महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी बऱ्याच काळापासून प्रयत्न सुरू आहेत. परमबीर सिंह यांच्यावर आरोप करण्यात आले असून त्यांचा तपास सुरू आहे.

परमबीर सिंग यांनी स्वीकारला पदभार…

एकीकडे महाराष्ट्रासंदर्भात देशाच्या संसदेत गदारोळ सुरू आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह सोमवारी सकाळी त्यांच्या नवीन कार्यालयात दाखल झाले. परमबीरसिंह यांना आता डीजी होमगार्डचे पद देण्यात आले आहे. त्यांनी सोमवारी सकाळी पदभार स्वीकारला. तथापि, यावेळी त्यांनी मीडियाच्या प्रश्नांवर कोणताही प्रतिक्रिया न देता मौन बाळगले.

सोमवारी सकाळीही मुंबईत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. एटीएसचे प्रमुख जयजित सिंह यांनी सकाळी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, एटीएस प्रमुखांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती गृहमंत्र्यांना दिली.

 

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*