केंद्रीय कायदामंत्र्यांची शरद पवारांच्या भूमिकेवर शंका; विचारले, पवारांना खंडणीखोरीची माहिती परमवीर सिंगांनी दिली होती, तर त्यांनी काय केले…??

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : परमवीर सिंग यांच्या पत्रावरून केवळ महाराष्ट्रात राजकीय गदारोळ उठलेला नसून त्याचे तीव्र पडसाद राजधानी नवी दिल्लीतही उमटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तथाकथित राजकीय गुरू शरद पवार हेच आरोपांच्या संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. Union law minister doubts Sharad Pawar’s role; Paramvir Singh had informed Pawar about the ransom

केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मनसुख हिरेन – सचिन वाझे – परमवीर सिंग – अनिल देशमुख खंडणी या प्रकरणावर सविस्तर भाष्य केले. शरद पवारांच्या एकूणच संशयास्पद भूमिकेवरून त्यांनी परखड सवाल उपस्थित केले.रविशंकर प्रसाद यांनी विचारले की, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे कोणाच्या दबावाखाली होता? शिवसेना, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे की शरद पवार यांच्या? खंडणीखोरी हा केवळ भ्रष्टाचाराचा मुद्दा नाही. हा लुटण्याचा महाभयानक प्रकार आहे. खंडणीखोरी हा गुन्हा आहे आणि या प्रकरणात शरद पवार यांना माहिती दिली जात असेल,

तर शरद पवार सरकारमध्ये नसतानासुध्दा त्यांना कोणत्या आधारावर माहिती दिली जात आहे…?? आणि असा प्रश्न देखील पडतो की हा गुन्हा थांबवण्यासाठी आणि या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी शरद पवारांनी त्यांच्या स्तरावर काय कारवाई केली…??

रविशंकर प्रसाद म्हणाले की सचिन वाझे प्रकरणात उद्धव ठाकरे यांची शांतता बरेच काही बोलून जात आहे. सचिन वाझेचा दर्जा एक एएसआय असून त्याला क्राइम सीआयडीचा प्रभार देण्यात आला आहे. हे सर्व आश्चर्यचकित करणारे आहे.एकीकडे मुख्यमंत्री त्याचा बचाव करतात, तर दुसरीकडे गृहमंत्री म्हणतात,

मला १०० कोटी द्या. ही एक अतिशय गंभीर बाब आहे. या प्रकरणाची गंभीर आणि प्रामाणिकपणे तपासणी होणे आवश्यक आहे. या प्रकरणी शरद पवारांची भूमिका स्पष्ट झाली आणि मुंबई पोलिसांची भूमिकादेखील उघड झाली की त्याची स्वतंत्र एजन्सीकडून या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक आहे.

स्वतंत्र एजन्सीजकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुखांना देखील अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात, अशी माहिती रविशंकर प्रसाद यांनी दिली.

 Union law minister doubts Sharad Pawar’s role; Paramvir Singh had informed Pawar about the ransom

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*