केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंनी शेतकरी आंदोलनात जखमी झालेल्या पोलीसांची भेट घेतली


वृत्तसंस्था

नवी दिल्लीः दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तिरथ रामशाह हॉस्पिटल सह आणखी एका रुग्णालयाला भेट दिली आहे . Union Home Minister Amit Shah met the police injured in the farmers agitation

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्या नंतर आंदोलन करणार्यांनी पोलीसांना मारहाण केली. ट्रॅक्टर रॅलीच्या वेळी झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांची अमित शाह यांनी भेट घेतली आहे.

दिल्ली बॉर्डरवर कृषी कायद्याविरोधात दोन महिन्यांहून अधिक काळ शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान जखमी पोलीसांना भेटण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा ट्रॉमा सेंटरमध्ये पोहोचले .दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी हिंसक टॅक्टर रॅलीबाबत 25 हून अधिक एफआयआरमध्ये 37हून जास्त शेतकरी नेत्यांच्या नावाचा उल्लेख आहे.या प्रकरणात आतापर्यंत 50 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे . तर 19 लोकांना अटक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आमच्याशी विश्वासघात केल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितले.

नोएडा चिल्ला बॉर्डर आणि एनएच 24 रिकामी केल्यानंतर सिंघू बॉर्डरवर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली. सिंघू बॉर्डरवर वाहनांना जाण्यापासून रोखण्यात येत आहे . तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बळ तैनात करण्यात आलं आहे.

Union Home Minister Amit Shah met the police injured in the farmers agitation

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था