Union budget 2021 – 22 देशातील नव्या मेट्रोसाठी ११ हजार कोटींची तरतूद; नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ५९७६ कोटी, तर नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटींची तरतूद


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील नव्या मेट्रोसाठी ११ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून मेट्रोचे जाळे वाढवण्यावर यापुढील काळात सरकारचा भर राहणार आहे. नागपूर मेट्रो फेज-2 आणि नाशिक मेट्रोच्या खर्चासाठी तरतुदीत वाढ करण्यात आली आहे. देशात सध्या 702 किमी अंतराचे मेट्रोचे जाळे आहे. तर 1000 किलोमीटरपेक्षा अधिक किलोमीटर अंतराचे जाळे तयार करण्यावर भर राहणार आहे. सर्व शहरी भागांमध्ये मेट्रोच्या सुविधेसोबत बसची संख्या वाढविण्यात येणार आहे. Union budget 2021 – 22 METRO

नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ५९७६ कोटी रूपयांची, तर नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटींची तरतूद करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.नागपूर आणि नाशिक मेट्रोला एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी जाहीर झाल्यावर नागपूरकर आणि नाशिककरांमध्ये आनंद पसरला असून सोशल मीडियावर अर्थमंत्र्यांचे अभिनंदन सुरू झाले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकर आणि नाशिककरांचे खास अभिनंदन केले असून अर्थमंत्र्यांचे आभार मानले आहेत. नाशिकचे मेट्रो मॉडेल अन्य शहरांमध्ये देखील राबविण्यात येणार असल्याचे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

तसेच राष्ट्रीय रेल्वे योजनेसाठी १ लाख १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यातून रेल्वेचे जाळे वाढविण्यावर भर देण्यात येईल. देशातील रस्त्यांसाठी १ लाख १८ हजार कोटींची तरतूद. त्यातील २५ हजार कोटींची तरतूद विधानसभेची निवडणूक होत असलेल्या पश्चिम बंगालमधील रस्त्यांसाठी करण्यात आली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी