Union Agriculture Minister Narendra Singh Tomar Asks Question to agitating Farmers on abolition of tax on sale and purchase of crops

पिकांच्या खरेदी-विक्रीवरील कर रद्द करण्याविरोधात आंदोलन योग्य आहे का?, केंद्रीय कृषिमंत्र्यांचा रोखठोक सवाल

कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आतापर्यंत शेतकरी नेत्यांशी 12 वेळा चर्चा केली आहे, परंतु शेतकरी नेते आपला हट्ट सोडायला तयार नाहीत. एकीकडे राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना आपली पिके नष्ट करण्याचे आवाहन केलेले आहे, यामुळे संयुक्त किसान मोर्चामध्येच मतभेद पाहायला मिळाले. यामुळेच आतापर्यंत आंदोलक शेतकर्‍यांवर संयतपणे भाष्य करणारे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आता कडक भूमिका घेतली आहे. Union Agriculture Minister Narendra Singh Tomar Asks Question to agitating Farmers on abolition of tax on sale and purchase of crops


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आतापर्यंत शेतकरी नेत्यांशी 12 वेळा चर्चा केली आहे, परंतु शेतकरी नेते आपला हट्ट सोडायला तयार नाहीत. एकीकडे राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना आपली पिके नष्ट करण्याचे आवाहन केलेले आहे, यामुळे संयुक्त किसान मोर्चामध्येच मतभेद पाहायला मिळाले. यामुळेच आतापर्यंत आंदोलक शेतकर्‍यांवर संयतपणे भाष्य करणारे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आता कडक भूमिका घेतली आहे. तोमर यांनी या आंदोलनाच्या हेतूंवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. गुरुवारी दिल्लीत कृषी विज्ञान यात्रा 2021च्या उद्घाटनप्रसंगी तोमर यांनी कृषी कायद्यांबाबत सरकारची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. तोमर म्हणाले की, लोकशाहीमध्ये कोणतेही सरकार शेतकर्‍यांविरुद्ध कायदे करण्याचे धाडस करू शकत नाही. नरेंद्र मोदी सरकारने बनवलेल्या कायद्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची पिके देशामध्ये कुठेही विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे.उपस्थित शेतकर्‍यांना संबोधित करताना तोमर म्हणाले की, आज शेतकऱ्याला आपले पीक मंडईमध्ये विकायला भाग पाडले जात असून लिलावाच्या पद्धतीने ते विकावे लागत आहे. याशिवाय मंडईचा करही भरावा लागतो. कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना विचारला की, आता शेतकरी बाजारात यावा की नाही, इतके स्वातंत्र्य देण्यास कोणाला अडचणी आहेत? तोमर म्हणाले, “तुम्ही जर मंडईत गेला तर तेथे कर आकारला जाईल, परंतु आमचा कायदा म्हणतो की जर तुम्ही तुमच्या घराबाहेर किंवा कोठेही विक्री केली तर तेथे ना केंद्र सरकारचा, ना राज्य सरकारचा कर लागेल. तुमच्या पिकांच्या खरेदी-विक्रीवर टॅक्स रद्द करणारे सरकार चांगले की, लावणारे चांगले आहे?

आंदोलन न्याय्य आहे का?

तोमर म्हणाले की, शेतकरी संघटना कर लादणार्‍या राज्य सरकारांच्या विरोधात आंदोलन करत नाहीत. ते म्हणाले, “आंदोलन करणारे बांधव कर माफ करणाऱ्या सरकारविरोधात आंदोलनही करत आहेत. हे आंदोलन न्याय्य आहे काय?”

कायद्याच्या विरोधकांना लक्ष्य करून कृषिमंत्री म्हणाले, “आपल्या देशात लोकशाही आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. देशात असेही काही लोक आहे जे सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोदीजींना शिव्याशाप देण्याचा संकल्प करतात. फरक एवढाच आहे प्रत्येक वेळी वेगवेगळा चेहरा असतो. मोदीजी देशाला प्रगतिपथावर नेत असल्याने अनेकांना पोटशूळ उठलाय.”

Union Agriculture Minister Narendra Singh Tomar Asks Question to agitating Farmers on abolition of tax on sale and purchase of crops

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*