आयसीसचा भारतासह अनेक देशांवर हल्याचा कट.. संयुक्त राष्ट्रसंघाचा इशारा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दहशतवादी संघटना आयसीस भारतावर हल्ल्याचा कट रचत आहे असा दावा संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात करण्यात आला आहे. या अहवालानुसार इराकमधील इस्लामिक स्टेट आणि त्याची सहकारी संघटना खोरासनचा नवा म्होरक्या शिहब अल मुजाहिर यांनी मिळून भारतासह आशियातील अनेक देशांत हल्ला करण्याचा कट रचत आहेत.UN warns ISIS may attack India

या दहशतवादी संघटना भारतासह अफगाणिस्तान, बांग्लादेश, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंकेत हल्ल्याची योजना आखत आहेत. चिंताजनक बाब ही की दहशतवादी संघटनेला हक्कानी नेटवर्कचीही साथ मिळाली आहे. हक्कानी नेटवर्क पाकिस्तानची गुप्तचर एजन्सी आयएसआयच इशाऱ्यावर काम करते.

संयुक्त राष्ट्राचे महासचिव एन्टोनिया गुटेरेसने स्वत: या अहवालात माहिती दिली आहे. महासचिवांच्या 12व्या रिपोर्टमध्ये आयसीसमुळे आंतरराष्ट्रीय शांततेला धोका निर्माण होत असल्याचं म्हटले आहे. आयसीसचे एक ते दोन हजार दहशतवादी पूर्ण अफगाणिस्तानात पसरले आहेत. ही दहशतवादी संघटनेनं जगभरात अनेक हल्ले केले आहेत. या संघटनेनं नोव्हेंबरमध्ये काबुल विद्यापीठावरही हल्ला केला होता.



शिहब अल मुहाजिरला जून 2020 मध्ये संघटनेचा नवा म्होरक्या म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार अफगाणिस्तान, भारत आणि बांग्लादेशसह अन्य आशियाई देशांत तो हल्ला करु इच्छित आहे. हाती आलेल्या माहितीनुसार त्याने हल्ल्याचा कट पूर्णत्वास नेण्यासाठी हक्कानी नेटवर्कसोबतही हाथ मिळवणी केली आहे.

हक्कानी नेटवर्क पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयसीसीसोबत मिळालेली आहे. पाकिस्तान गुप्तचर संघटनेच्या इशाºयावरच ही दहशतवादी संघटना अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद पसरवत आहे. पाकिस्तानच्या उत्तरी वजिरिस्तानमध्ये ही दहशतवादी संघटना आरामात आपलं काम करत आहे आणि याला पाकिस्तान सरकारचा वरदहस्त आहे. अफगाणिस्तानातील अनेक हल्ल्यांमागे या दहशतवादी संघटनेचा हात आहे.

रिपोर्टद्वारे मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण आशियात आपली मुळं तपासण्यासाठी करकर ने भरती सुरु केली आहे. त्यासाठी आॅनलाईन मंचावर एक प्रोपोगँडा पसरवून लोकांचा शोध घेत आहे. मालदीव आणि श्रीलंकामध्ये खासकरुन ही मोहीम जोरदार सुरु आहे.

UN warns ISIS may attack India

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*