म्यानमारमधील लष्करी बंड हाणून पाडू; संयुक्त राष्ट्र संघाने कसली कंबर

विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : म्यानमारमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अद्यापही सुरक्षा परिषदेत एकमत झाले नसल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच, या देशातील लष्करी बंड हाणून पाडण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्र आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.UN vows to restore democracy in Myanmar

म्यानमारमध्ये लष्करी बंड होऊन या देशाच्या नेत्या आँग सान स्यू की, अध्यक्ष यू विन मिंट आणि इतर अनेक नेत्यांना लष्कराने ताब्यात घेतले आणि सत्ता हातात घेतली आहे. बेकायदा पद्धतीने वॉकी टॉकी आयात केल्याचा आरोप स्यू की यांच्यावर ठेवण्यात आला आहे. म्यानमारमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी (ता. २) संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक झाली होती. मात्र, यासंदर्भात कारवाईबाबत त्यांच्यात एकमत झाले नाही.म्यानमारमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारकडून सत्ता लष्कराने हस्तगत केल्याच्या घटनेवर ‘जी-७’ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आज चिंता व्यक्त केली आहे. ‘जी-७’ देशांच्या गटात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका यांचा समावेश आहे.

UN vows to restore democracy in Myanmar

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*