रिहाना, ग्रेटानंतर संयुक्त राष्ट्र मानवाधिकारचे ट्विट; शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्याचा दिला सल्ला

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अमेरिकन पॉपस्टार रिहाना आणि पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गसह अनेकांनी शेतकरी आंदोलकांना पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संघटनेने शेतकरी आंदोलनाबद्दल ट्विट करत सल्ला दिला आहे.UN human Rights suggests early solution for farmers agitation

रिहाना, ग्रेटा आणि मिया खलिफा यांनी ट्विट केल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाचं लक्ष भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे वेधलं गेलं. परदेशातील नामवंतांनी केलेल्या ट्विटवरून भारतात बरंच रणकंदन सुरू आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्टपणे भूमिका मांडत उत्तरही दिलं आहे.दरम्यान, आंदोलन सुरू असलेल्या परिसरामधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बॅरिकेट्स आणि खिळे ठोकून रस्ते अडवण्यात आल्यानं आंदोलनकांची मूलभूत गरजांसाठी हेळसांड सुरू झाली होती. UN Human Rightsनं ट्विट करत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

“आम्ही भारतातील अधिकारी आणि आंदोलकांना सांगू इच्छितो की, शेतकरी आंदोलनादरम्यान जास्तीत जास्त संयम पाळावा. अभिव्यक्तीचे अधिकार शांततापूर्ण मार्गाने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं सुरक्षित राखले जावेत. या मुद्द्यावर योग्य तोडगा काढणे सर्वांसाठी महत्त्वाचे झालं आहे,” असे म्हटलं आहे.

UN human Rights suggests early solution for farmers agitation

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*