UGC Big Decision CA, CS, ICWA qualifications now equivalent to postgraduate degree

CA, CS, ICWA equivalent to PG degree : सीए, सीएस आणि आयसीडब्ल्यूए डिग्रीला आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा, यूजीसीचा महत्त्वाचा निर्णय

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) CA शिकणार्‍या विद्यार्थ्यांना चांगली बातमी दिली आहे. CA, CS आणि ICWA डिग्री आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा देण्यात आला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सच्या आवाहनावर यूजीसीने हा निर्णय घेतला आहे. आयसीएआयने म्हटले की, या निर्णयामुळे सीए विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास मदत होईल. UGC Big Decision Now CA, CS, ICWA equivalent to PG degree


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) CA शिकणार्‍या विद्यार्थ्यांना चांगली बातमी दिली आहे. CA, CS आणि ICWA डिग्री आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा देण्यात आला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सच्या आवाहनावर यूजीसीने हा निर्णय घेतला आहे. आयसीएआयने म्हटले की, या निर्णयामुळे सीए विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास मदत होईल.

महत्त्वाचा आहे यूजीसीचा निर्णय

आयसीएआयचे धीरज खंडेलवाल यांनी ट्वीट करून म्हटले की, यूजीसीने सीए, सीएस आणि आयसीडब्ल्यूए यांना पीजी डिग्री म्हणून मान्यता दिली आहे. आयसीएआय ही एक वैधानिक संस्था आहे जी अॅक्ट ऑफ पार्लियामेंट – द चार्टर्ड अकाउंटंट्स अॅक्ट 1949 अंतर्गत स्थापन करण्यात आली होती. या सं‌स्थेशी तीन लाखांहून अधिक सदस्य जोडलेले आहेत. 12वी उत्तीर्ण केल्यानंतर ICAI एंट्रन्स एक्झामच्या माध्यमातून सीए फाउंडेशन कोर्समध्ये प्रवेश घेता येतो.सीए जून परीक्षेचे वेळापत्रक -2021 जाहीर

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने फाऊंडेशन कोर्ससाठी सीए जून परीक्षा-2021चे वेळापत्रक जाहीर केले आहे. उमेदवार आयसीएआयची वेबसाइट icai.org वर सूचना पाहू शकतात. यानुसार, सीए मेची परीक्षा 24, 28 आणि 30 जून रोजी घेण्यात येणार आहे. याशिवाय सीए इंटरमीजिएट आणि अंतिम परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. सीए इंटरमीजिएटच्या परीक्षा 22 मे रोजी सुरू होतील आणि अंतिम परीक्षा 21 मे रोजी सुरू होतील.

UGC Big Decision CA, CS, ICWA qualifications now equivalent to postgraduate degree

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*