उध्दव ठाकरे यांच्या भाषणाचा अर्थ सांगा, १००१ रुपये मिळवा, संदीप देशपांडे यांची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबूकवरून राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणिस संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ सांगा आणि 1001 रुपये मिळवा, असं ट्विट केले आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबूकवरून राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणिस संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ सांगा आणि 1001 रुपये मिळवा, असं ट्विट केले आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या काळात अनेक वेळा फेसबुक लाईव्हवरून जनतेशी संवाद साधला आहे. मात्र, यावरून शिवसेनेचे कार्यकर्तेही नाराज आहे. फक्त ‘बोलबच्चनगिरी’ असे या लाईव्हचे वर्णन केले जात आहे. चीनी व्हायरस्मुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना कोणताही दिलासा न देता उध्दव ठाकरे केवळ बोलत राहतात, अशी टीका होत आहे. यावरूनच देशपांडे यांनी उध्दव ठाकरे यांच्या भाषणाचा अर्थ सांगा आणि १००१ रुपये मिळवा, असे म्हटले आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादावरही देशपांडे यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्यावेळेस मिनिमम काँमन प्रोग्राम ठरला होता.पण, हे सरकार मिनिमम काँमन हिंदुत्वावर गेल्याची टीका देशपांडे यांनी केली आहे.

 

राज ठाकरेंनी दीड महिन्यापूर्वी मंदिर उघडण्याची मागणी केली होती. राज्यात मॉल उघडले जातात मग मंदिरं का बंद ठेवली जातात, असा सवाल देशपांडे यांनी केला. चीनी व्हायरस सारख्या संकटाच्या काळात देवाचा आधार असतो. यामुळे मंदिर उघडली गेली पाहिजेत, असंही संदीप देशपांडेंनी सांगितले.

लोकल सेवा सुरू करण्यावरुनही संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले होते. तुम्ही रेस्टॉरंट-बार सुरु करत आहात. एक-एक आस्थापना सुरु करताय, पण त्यासाठी लोकांनी कामावर कसं जायचं? त्या प्रश्नाचं उत्तर सरकार देत नाही, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली होती.

आंदोलन करुन जर सरकारला अक्कल येत नसेल आणि सरकारला डोकं नसेल तर आपण तरी काय करणार? हे सरकार फक्त फेसबुकवर घोषणा करणारं आहे, प्रत्यक्षात काहीच केलं जात नाही, असं देशपांडे म्हणाले होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*