उध्दव ठाकरेंच्या संवादातून जनतेचा फक्त भ्रमनिरास, बोलाचीच कढी, बोलाचाच भात प्रवीण दरेकर यांचा आरोप


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( uddhav thackeray news  ) यांचा आजचा संवाद महाराष्ट्रातील जनतेचा फक्त भ्रमनिरास करणार होता. केवळ संवादातून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे. परंतु, या संवादाने जनतेला कुठलीही भरीव गोष्ट मिळाली नाही. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात होता,असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजचा संवाद महाराष्ट्रातील जनतेचा फक्त भ्रमनिरास करणार होता. केवळ संवादातून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे. परंतु, या संवादाने जनतेला कुठलीही भरीव गोष्ट मिळाली नाही. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात होता, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.uddhav thackeray news

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी केलेल्या फेसबुक लाईव्हवर टीका करताना दरेकर म्हणाले की, आजही मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, मराठा विद्यार्थ्यांचे भवितव्याचे काय? नक्की सरकार यासंदर्भात काय करणार आहे हे सरकार सांगत नाही. अतिवृष्टी व निसर्ग चक्रिवादळामुळे महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत, निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानीची कोकणात मदत मिळाली नाही. महिलांवरील अत्याचाराचा गंभीर प्रश्न आहे. पण यावर मुख्यमंत्र्यांनी काहीच भाष्य केलं नाही. uddhav thackeray news

दरेकर म्हणाले की, एसटी कर्मचारी रोज आंदोलन करत आहेत. चार महिने झाले तरीही त्यांचे पगार झालेले नाहीत. एसटी कर्मचारी रोज मरणयातना भोगतोय. या कामगारांची दिवाळी कशी गोड होणार, यापैकी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी आजच्या संवादातून दिले नाही. केवळ सामंजस्य करार करून चालणार नाहीत. त्या कराराची अंमलबजावणी जलद गतीने होताना दिसत नाही. शहरातून ग्रामीण भागामध्ये जे चाकरमानी गेले, त्यांचं भविष्य काय? याचा विचारविनियम होताना दिसत नाही. तसेच याबाबत मुख्यमंत्री संवादात काहीही बोलले नाहीत.

मुख्यमंत्र्यांचा संवाद हा केवळ ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ आहे, असे सांगून दरेकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी केवळ भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मंदिरांबाबत मुख्यमंत्र्यांनी ठोस असं काहीच सांगितलं नाही. महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

uddhav thackeray news

पुण्यामधील एका महिलेचे डोळे नराधमांनी फोडले, त्यावर मुख्यमंत्र्याचे भाष्य नाही. राज्यातील सर्व मुद्द्यांवर त्यांनी बोलण्याची आवश्यकता होती, पण तसं झालं नाही. विनाअनुदानित शिक्षक पगारापासून वंचित आहेत, कोविडच्या डॉक्टरांनाही पगार मिळत नाही अशा जिव्हाळ्याच्या विषयावर मुख्यमंत्री काहीही बोलले नाहीत, असे दरेकर म्हणाले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था