…तर मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही, खासदार नवनीत राणा यांचा इशारा


  • शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर केली नाही तर मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे. 

विशेष प्रतिनिधी

अमरावती : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर केली नाही तर मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात बोंड अळीचे झाड पेटून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.(uddhav thackeray news )

मागील पंधरा दिवसांपासून कपाशीच्या पिकावर बोंडअळीने आक्रमण केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता सोयाबीन नंतर कपाशी हातातून गेल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान राज्यातील लोकांना आलेली अव्वाच्या सव्वा वीजबिल व सोबत परतीच्या पावसाने झालेल्या विदभार्तील नुकसानीच्या प्रश्न घेऊन खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा उद्या राज्यपाल भगतसिंग यांची भेट घेणार आहे.

uddhav thackeray news

राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमवीर काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या प्रमुख नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाचे दौरे केले होते. यानंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १० हजार कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आली आहे. फळबागांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची घोषणा करण्यात आली होती.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती