मंद बुध्दी, बहु गर्वी, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा, अमृता फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका


मंद बुद्धी, बहु गर्वी, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा? अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग जागेवरून त्यांनी ही टीका केली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मंद बुद्धी, बहु गर्वी, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा? अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग जागेवरून त्यांनी ही टीका केली आहे. uddhav thackeray news

भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्गच्या जागेवरुन महाराष्ट्र सरकारवर निशणा साधला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शेलार यांच्या टीकेचा व्हिडीओ रिट्विट करत महाराष्ट्र सरकारवर टीका केली.uddhav thackeray news

शेलार यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री महोदयांनी आरेच्या ऐवजी कांजूरला मेट्रोची कारशेड नेण्याचा निर्णय केला. त्याच वेळेला आम्ही म्हटलं होतं, राज्य सरकारचा यामागे कुहेतू दिसतोय. घोषणा झाली तेव्हाच प्रतिक्रिया देताना आम्ही स्पष्ट म्हटलं होतं. अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र यामुळे मुंबईकरांना त्रास होतोय. आज ज्या पद्धतीच्या गोष्टी समोर येत आहेत. त्यावेळेला सुद्धा सांगताना आम्ही म्हटले होते. मीठागर आयुक्त सॉल्ट कमिश्नरची परवानगी जागा नावावर करताना घेतली होती का?

आज केंद्राच्या पत्रानं एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे. अहंकारी प्रवृत्तीनं घेतलेल्या निर्णयामुळे मुंबईकरांना त्याच्या दुष्परिणामांचा सामना करावा लागतोय, अशी टीका करून शेलार म्हणाले, मेट्रोच्या विकासामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारची कार्यपद्धती ही तिघाडीची कार्यपद्धती आहे. पहिल्यांदा लटकवणे, अडकवणे, जागा ट्रान्सफर करताना ज्या पद्धतीच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक होती, ती केलेली दिसत नाही. मीठागर आयुक्तांची परवानगी घेतलेली दिसत नाही.

uddhav thackeray news

मेट्रोच्या प्रकल्पात माननीय उद्धव ठाकरेजींनी घेतलेला निर्णय हा लटकवणे, अडकवणे आणि भटकवणे अशा पद्धतीचा कारभार आहे. मुंबईकरांच्या माथी दिरंगाई तुम्ही थोपवली आहे. यामध्ये राज्य सरकार सर्वस्वी दोषी असल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी केला होता.

दरम्यान, कांजुरमार्गमधील प्रस्तावित मेट्रो कार शेडसाठी जमीनीबाबत केंद्राकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आले की, या जमिनीचा मालकी हक्क अजुनही भारत सरकारजवळ आहे. एवढेच नाही तर भारत सरकारने या जमीनीवर आपला बोर्डही लावला आहे. केंद्र सरकारकडून एक पत्र राज्य सरकारला पाठवले आहे. महाराष्ट्र सरकारचे चीफ सेक्रेटरी संजय कुमार यांच्यानुसार, हे पत्र त्यांनी महसूल विभागाकडे पाठवले आहे. त्यांनी दावा केला की, राज्य सरकार आपले काम थांबवणार नाही.

भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनीही सरकारवर जोरदार निशाणा साधला. वैयक्तिक द्वेष करून राज्य कधीच चालवता येत नाही हे ठाकरे सरकारने ध्यानात घेऊन आपली अब्रू, जनतेचे हाल आणि तिजोरीच्या पैशांचा चुथडा त्वरित थांबवावा. दुसऱ्याच्या जीवावर संकल्प सोडू नये.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती