सणासुदीलाही शेणचं आठवले…


खरे तर गेल्या वर्षभरापासून माझ्या सरकारने काय काय केले, याची जंत्री ठाकरेंनी सादर करायला हवी होती. मात्र, धास्ती घेऊन घराकत बसून राहिल्यामुळे ठाकरेंना काय बोलावे, हे अजिबात सुचत नव्हते. त्यामुळे त्यांनी परंपरेप्रमाणे अखेर शिवराळ भाषेचाच आसरा घेतला. त्यामुळेच सणासुदीच्या दिवशी शिवसैनिकांना शेणाचा प्रसादच चाखायला मिळाला. uddhav thackeray dasara


ऋग्वेद

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेना या माजी हिंदुत्ववादी पक्षाचे पक्षप्रमुख, घरात बसूनच कारभार करण्यास प्राधान्य देणारे आणि नुकतीच सेक्युलॅरिझमची झूल पांघरलेले उध्दव ठाकरे दसऱ्याच्या दिवशी चक्क घराबाहेर पडले होते. अर्थात, त्यासाठी लोकहिताचे कोणतेही कारण नव्हते, तर स्वपक्षाच्या दसरा मेळाव्यात बोलण्यासाठी ते बाहेर पडले होते. दसऱ्याच्या दिवशी ज्वलंत हिंदुत्वाचा हुंकार करायचा आणि शिवसैनिकांसह देशभरातील हिंदू जनांना नवी उर्जा देण्याची पद्धत शिवसेनेत हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत होती.

 

विशेष म्हणजे तेव्हाची शिवसेनाही हिंदुत्ववादी होती, कोण्या लुंग्यासुंग्या अथवा पांढऱ्या झगेधाऱ्यांकडून सेक्युलॅरिझमचे सर्टिफिकेट मिळविण्याची शिवसेनेला गरज नव्हती. तसे कोणी करण्याचा प्रयत्न केल्यास बाळासाहेब ठाकरे त्यांना एका सेकंदात हुसकावून लावत असत. असो. हा झाला भुतकाळ. आज बाळासाहेब ठाकरेही हयात नाहीत आणि ज्वलंत हिंदुत्व सांगणारी शिवसेना सेक्युलक कुटीरोद्योगाला लागली आहे.

 

तर सणासुदीला साधारणपणे प्रत्येक लोकांच्या घरी चैतन्यमय वातावरण असते. दसऱ्याचा तर अगदीच उत्साह असतो, कारण दसऱ्यापाठोपाठ येणाऱ्या दिवाळीची चाहुल लागलेली असते. या दिवशी घरात काहीतरी गोडधोड करण्याची परंपरा प्रत्येक जण पाळतो. त्यानंतक संध्याकाळी देवदर्शन आणि सीमोल्लंघन झाल्यानंतर सोने लुटतानाही जिभेवर साखरच असते. मात्र, याला सणसणीत अपवाद करून दसऱ्याच्या संध्याकाळी शेण आठवण्याचा सेक्युलर पराक्रम राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना या सेक्युलर पक्षाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करून दाखविला आहे. त्यातही ठाकरेंनी हिंदुत्वाची व्याख्या मांडली, असा टुकार दावा त्यांचे भाट मंडळी ज्या तडफेने करीत आहेत; त्यावरून शिवसेनेने सेक्युलॅरिझमची परिक्षा आता पास केली असल्याचेच स्पष्ट झाले आहे.

 

“तोंडात शेण भरून आमच्यावर गोमुत्राच्या गुळण्या टाकल्या” असं अगदी रडक्या स्वरात सांगत ठाकरेंनी भाजपवर टीका केली. सणासुदीच्या दिवशी आपल्या पक्षाच्याच व्यासपीठावरून स्वत:चाच असा अपमान सांगणारा नेता शिवसैनिकांनी प्रथमच पाहिला. बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांना हे ऐकून नक्कीच वेदना झाल्या असतील. मात्र, सेक्युलर विचारांच्या तासमीत तयार झालेल्या नव्या शिवसैनिकांना तर यामुळे आनंदाचं भरतच आल आहे. मात्र, एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे तुमच्या अंगावर अशा गोमुत्राच्या गुळण्या टाकल्या जात होत्या, तेव्हा तुम्ही त्या गोमुत्राला चविष्ट बासुंदी समजून सत्तेचा उपभोग घेत होतात. तेव्हा तुम्हाला ते गोमुत्र चांगलचं चविष्ट लागत होतं, असं म्हणायला वाव आहे.

 

 

पुढे ठाकरे म्हणाले की “गाय जगो आणि माय मरो” असं आमच हिंदुत्व नाही. पण हा डायलॉग मारताना ठाकरेंना विसर पडला की आपल्या सुमार कारभारामुळे कोरोनामुळे किती आयांचे बळी गेले, लाजिरवाणी बाब म्हणजे महाराष्ट्रात कोव्हिड सेंटरमध्येही माता – भगिनींवर बलात्कार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना लाज वाटली नाही. दुसरीकडे राज्यात महिलांवर बलात्काराच्या अनेक घटना घडल्या आहेत, मात्र त्याबद्दल काही बोलण्याऐवजी लाईव्ह येऊन टुकार कोट्या करण्यास मुख्यमंत्री व्यस्त होते. तेव्हा त्यांना हिंदुत्वाची आठवण आली नाही.

 

डायलॉगबाजी करताना ठाकरे भलतेच चेकाळले होते. ते म्हणाले, “शिवसेनाप्रमुख म्हणायचे आम्हाला देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व नको. हे हिंदुत्व आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलं. तुम्हीच बडवा ती घंटा तुम्हाला दुसरं येतंय काय? मला अतिरेक्यांना बडवणारं हिंदुत्व हवंय. नाहीतर करोना आला थाळ्या बडवा, घंटा बडवा हेच तुमचं हिंदुत्व. बेडूक उड्या, कोलांटी उड्या, दोरीच्या उड्या मारणारं हे कसलं हिंदुत्व. आमचं हिंदुत्व असं नाही”. हे अगदी नाट्यमय आवेशात बोलताना ठाकरेंना विसर पडला की अतिरेक्यांना त्यांच्या घरात घुसून ठोकण्याची पध्दत हिंदुत्ववादी नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे. मात्र, उध्दव ठाकरे सध्या ज्यांच्या मांडीत बसून मुख्यमंत्री झाले आहेत, ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अतिरेक्यांना ठोकल्यावर त्यांच्या समर्थनासाठी पुढे येत असतात. अतिरेकी इशरत जहाचा भाऊ तर ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्रीच आहे. मात्र, ठाकरेंनी आपण सावरकर स्मारकात आहोत याचे तरी भान हिंदुत्वावर फुकटची डायलॉगबाजी करताना ठेवायला हवे होते.

uddhav thackeray dasara

 

खरे तर गेल्या वर्षभरापासून माझ्या सरकारने काय काय केले, याची जंत्री ठाकरेंनी सादर करायला हवी होती. मात्र, धास्ती घेऊन घराकत बसून राहिल्यामुळे ठाकरेंना काय बोलावे, हे अजिबात सुचत नव्हते. त्यामुळे त्यांनी परंपरेप्रमाणे अखेर शिवराळ भाषेचाच आसरा घेतला. त्यामुळेच सणासुदीच्या दिवशी शिवसैनिकांना शेणाचा प्रसादच चाखायला मिळाला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती