उध्दव ठाकरे म्हणजे ‘गंगू तेली’?; कंगना रनौटने केले सूचीत; सत्तेसाठी वडिलांची तत्वे विकल्याचा आरोप


प्रसिध्द अभिनेत्री कंगना रनौटचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरोधात तोफखाना सुरूच आहे. सत्तेसाठी वडिलांची तत्वे विकल्याचा आरोप करताना कंगना रनौटने ‘कहाँ राजा भोज, कहाँ गंगू तेली’, ही म्हण उद्धव ठाकरेंना उद्देशून वापरली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : प्रसिध्द अभिनेत्री कंगना रनौटचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरोधात तोफखाना सुरूच आहे. सत्तेसाठी वडिलांची तत्वे विकली, असा आरोप करत कंगना ‘कहाँ राजा भोज कहाँ गंगू तेली’, असे म्हटले आहे. एका ट्विटमध्ये कंगना म्हणाली की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या वडिलांची तत्त्वे विसरले आहेत. रिपब्लिक टीव्हीविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या मुद्यावरुन पत्रकारांवर अत्याचार करणा-या अशा सरकारचा धिक्कार असो, असे कंगना म्हणाली आहे. kangana ranaut

बीएमसीने कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड केल्यापासून ती गेल्या काही दिवसांपासून सतत महाराष्ट सरकार, मुंबई महापालिका, मुंबई पोलिस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे.

अभिनेत्री कंगना रनौट हिच्याविरोधात मुंबईत आणखी एक एफआयआर दाखल केला आहे. याकाळात तिने मुंबई पोलिस आणि धर्मावरुन आक्षेपार्ह ट्विट केल्याबद्दल मुंबईतील वकील अली काशिफ खान यांनी अंधेरी कोर्टात तिच्याविरोधात गुन्हेगारी तक्रार दाखल केली आहे. कंगनाने वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याच्या आदेशानंतर सोशल मीडियावर न्यायपालिकेविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे खान यांनी मुंबईच्या अंधेरी कोर्टात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे.

कंगनावर देशद्रोह आणि समाजात द्वेष पसरवण्याचाही आरोप करत त्यांनी ती सोशल मीडियाचा गैरवापर करत असल्याचे सांगितले. कंगना समाज, कायदा, तपास यंत्रणा व न्यायपालिकेची थट्टा करत आहे, असे खान म्हणाले आहेत.

kangana ranaut

मागील 10 दिवसांत कंगनाविरोधात दाखल झालेली ही तिसरी तक्रार आहे. 10 दिवसांपूर्वी शेतकर्यांचा अपमान केल्याप्रकरणी तुमकुर (कर्नाटक) येथील क्याथासांद्रा पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. कंगनाने सीएए विरुद्ध झालेल्या आंदोलनाचा संदर्भ देत कृषी विषयक विधेयकांविरुद्ध आंदोलन करणार्या शेतकर्यांवर निशाणा साधला. त्यांना दहशतवादी म्हटले होते. तिच्या या वक्तव्यावरुन तिच्याविरोधात वकील एल. रमेश नाईक यांनी तक्रार दाखल केली होती.

पाच दिवसांपूर्वी कास्टिंग डायरेक्टर आणि फिटनेस ट्रेनर साहिल अशरफ अली सय्यद यांच्या याचिकेवर सुनावणी देताना वांद्रे कोर्टाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. हिंदू आणि मुस्लीम या दोन समुदायांमध्ये परस्परांविषयी द्वेष निर्माण होईल आणि जातीय सलोखा बिघडेल, अशा हेतूने वारंवार ट्विट करत असल्याच्या आरोप कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांच्यावर आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था