निवडणुकांसाठी राजकारण करणाऱ्या कॉंग्रेस, शिवसेनेला उदयनराजेंचा शहाणपणाचा सल्ला


औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कॉंग्रेस आणि शिवसेनेने औरंगाबादच्या नामांतराचे राजकारण सुरू केले आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे यांनी यावर दोघांनाही शहाणपणाचा सल्ला दिला आहे. नामांतराचा निर्णय लोकभावनेतून व्हावा असे त्यांनी म्हटले आहे. Udayan Raje’s wise advice to Congress and Shiv Sena who are doing politics for elections


विशेष प्रतिनिधी

सातारा : औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कॉंग्रेस आणि शिवसेनेने औरंगाबादच्या नामांतराचे राजकारण सुरू केले आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे यांनी यावर दोघांनाही शहाणपणाचा सल्ला दिला आहे. नामांतराचा निर्णय लोकभावनेतून व्हावा असे त्यांनी म्हटले आहे.

औरंगाबादच्या नामांतरावरून महाविकास आघाडीत एकमत नसून परस्पर विरोधी वक्तव्ये केली जात आहेत. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे नामांतराचं समर्थन केले असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात मात्र विरोध कायम असल्याचं सांगत आहे.यावर उदयनराजे म्हणाले की, औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय लोकच घेतील. बॉम्बेचे मुंबई केले तसे औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा निर्णय लोक भावनेतूनच व्हावा. औरंगाबादचे नामांतर करताना राज्यात उद्रेक होणार नाही याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे. नामांतर करताना कोणाचीही मानहानी होऊन उद्रेक होणार नाही याचा प्रत्येकाने सविस्तर विचार करावा.

Udayan Raje’s wise advice to Congress and Shiv Sena who are doing politics for elections

उदयनराजे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज हे केवळ राजे होते म्हणून ते ओळखले जात नाहीत. जसे ते आमचे पूर्वज आहेत तसेच त्यांचा इतिहास वाचला तर त्यांची कर्तबगारी, हुशारी, निर्णयक्षमता आणि लोकहिताच्या निर्णयामुळे ते ओळखले जातात. त्यामुळे औरंगाबादचे नामांतर व्हावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु ज्याप्रमाणे बॉम्बेचे मुंबई झाले. त्याप्रमाणे पूर्वीपासून असलेल्या औरंगाबादच्या बाबतीत नाव बदलायचे की नाही याचा निर्णय लोकशाहीनुसार लोकच घेतील अशी अशी भूमिका स्पष्ट केली.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती