वाझे प्रकरणी आणखी दोन मंत्र्यांना घरी जावे लागणार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ठेवलेल्या स्फोटकांप्रकरणी आणखी दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल, यातील एका मंत्र्यांचा लगेच तर दुसरे मंत्रीही त्या पाठोपाठ राजीनामा देतील, असा खळबळजनक दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. Two more misters will resign in Maharashtra

पाटील म्हणाले, वाझेंच्या विषयात दोन एजेंन्सी काम करत आहेत. त्या अतिशय परिणामकारक काम करत आहे. याप्रकरणाची खूप लांबपर्यंत मूळ असल्याचे उघड होईल. ती खणून काढण्यासाठी एनआयए आणि एटीएस यशस्वी होतील. यापूर्वी एका मंत्र्याचा राजीनामा झाला आहे. आणखी दोन जणांचा राजीनामा लवकरच होईल.”दरम्यान पाटील यांच्या या वक्त्यव्याआधीच वाझे यांच्यामुळे सरकारची फार मोठी कोंडी झाली आहे. याआधी पूजा चव्हाण प्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे विधानसभेचे अधिवेशन काहीसे सुरळीत होईल असा महाविकास आघाडीचा होरा होता. मात्र अधिवेशनात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाझे प्रकरणावरून राज्य सरकारची अब्रूच वेशीवर टांगली. त्यामुळे सध्या राज्य सरकार जबरदस्त बॅकफूटवर गेले आहे.

Two more misters will resign in Maharashtra

Antilia Case: Why Sachin Vaze was arrested by NIA? Who is the mastermind of the plot?

Antilia Case: Why Sachin Vaze was arrested by NIA? Who is the mastermind of the plot?

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था