दोन मंत्री असूनही ठाणे बेवारस, रुग्णालयात मृतदेहांचीही अदलाबदल


राज्याच्या मंत्रीमंडळातील वजनदार म्हणविले जाणारे दोन मंत्री असतानाही ठाण्यातील नागरिकांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत. रुग्णालयांकडूनच नागरिकांना वेठीस धरले जात असून मृतदेहांची अदलाबदल होण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नातेवाईकाचा समजून दुसऱ्याच मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर आपला नातेवाईक रुग्णालयातच उपचार घेत असल्याचे निदर्शनास आल्याचे धक्कादायक प्रकार ठाण्यात घडले आहेत. ही अनागोंदी दिवसेंदिवस वाढत असताना मंत्री मात्र कुठे दिसत नाहीत.


विशेष प्रतिनिधी

ठाणे : राज्याच्या मंत्रीमंडळातील वजनदार म्हणविले जाणारे दोन मंत्री असतानाही ठाण्यातील नागरिकांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत. रुग्णालयांकडूनच नागरिकांना वेठीस धरले जात असून मृतदेहांची अदलाबदल होण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सार्वजनिक वाहतूक मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड या दोन मंत्र्यांचा कलगीतुरा सुरू आहे. त्यामुळे ठाण्यातील प्रशासनावर वचक राहिलेला नाही. रुग्णालयाच्या असंवेदनशिल कारभारामुळे मृतदेहांची अदलाबदल झाली आणि त्याचा प्रचंड मनस्तान दोन्ही कुटुंबांना झाला आहे.

बाळकुमच्या कोरोना रुग्णालयातील रुग्णांच्या मृतदेहांची अदलाबदल झाली. हे लपविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. भालचंद्र गायकवाड यांचा मृत्यू तीन दिवसांपूर्वीच झाल्याचे पोलिस आणि रुग्णालयाकडून कळाल्यानंतर गायकवाड कुटुंबीयांनी जनार्दन सोनावणे यांना भेटण्याची विनंती केली होती. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल सोनावणे यांना पाहण्यासाठी गायकवाड कुटुंबीय आयसीयूमध्ये गेले.

रुग्णालयातील आणखी एक भयंकर गोंधळ त्यावेळी समोर आला. रुग्णालयात सोनावणे यांच्यावर मोरे या नावाने उपचार सुरू असल्याचे वास्तव उघड झाले. विशेष म्हणजे, मोरे या रुग्णालयात उपचार घेऊन बरे होऊन आधीच घरी परतले होते तर सोनावणे यांचे त्यापूर्वीच निधन झाले होते, असे धक्कादायक आरोप सोमय्या यांनी केला. सोनावणे आणि गायकवाड कुटुंबीयांना भेटल्यानंतर भाजप शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेतली.

आमदार निरंजन डावखरे यांनी रुग्णालय उभारण्याचा विक्रम करण्यापेक्षा त्यामध्ये पुरेशी व्यवस्था उभी करा, अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत. चीनी व्हायरसच्या रुग्णांशी महापालिका क्रूरपणे वागत आहे. ठाण्यातील दोन्ही कॅबिनेट मंत्री सत्तेत मश्गुल आहेत, असा आरोप सोमय्या व आमदार निरंजन डावखरे यांनी केला. दोन्ही मंत्र्यांनी साधी कुटुंबीयांची भेटही घेतलेली नाही, तसेच व्यवस्थापनाशी चचार्ही केली नाही, ही दुदैर्वाची बाब आहे, असे ते म्हणाले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती