दोन आण्यांची भांग आणि उध्दव ठाकरेंना घराबाहेर काढून दाखवा, राहुल गांधींच्या वक्तव्याची उडविली खिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कायर असल्याचाचा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. एवढेच नव्हे तर कॉंग्रेसचे सरकार असतं तर १५ मिनिटात चीनला हाकलले असते असाही दावा राहुल यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याची भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी चांगलीच खिल्ली उडविली आहे. लोकमान्य टिळक यांच्या एका अग्रलेखाचा संदर्भ त्यासाठी त्यांनी दिला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कायर असल्याचे सांगत आमचे कॉंग्रेसचे सरकार देशात सत्तेत असते तर चीनला १५ मिनिटात हाकलले असते, असा दावा राहुल गांधी यांनी नुकताच केला. त्यांच्या या वक्तव्याची भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी चांगलीच खिल्ली उडविली आहे. लोकमान्य टिळक यांच्या एका अग्रलेखाचा संदर्भ त्यांनी त्यासाठी दिला आहे.

भातखळकर यांनी ट्विट करून म्हटले आहे की, आमचं सरकार असतं तर चिनी सैन्याला १५ मिनिटात बाहेर काढलं असतं, इति राहुल गांधी. दोन आण्याची भांग घेतली तर कितीही भारी कल्पना सुचू शकतात, असे लोकमान्य टिळक एका अग्रलेखात म्हणाले होते. नेहरूंपासून चीन कडून मार खाण्याचा कॉंग्रेस सरकारचा इतिहास असताना राहुल गांधींना असं सुचतं त्याचं उत्तर टिळकांनी दिलेलं आहे, असं भातखळकर म्हणाले.

भाजपाचे नेते निलेश राणे यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्याची कधी हुश्शार होणार असे म्हणत खिल्ली उडविली आहे. त्यांनी यावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. राणे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ‘राहुल गांधी म्हणतात आमची सत्ता असती तर १५ मिनिटांत चीनला बाहेर फेकलं असतं. चीनचं राहू द्यात तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे.

आधी एक काम करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराच्या बाहेर काढून दाखवा. ‘राहुल गांधींचा इतिहास कच्चा आहे. जेव्हा काँग्रेसचे ए. के. अँटनी संरक्षणमंत्री होते तेव्हा चीननं भारताच्या काही भागांत घुसखोरी केली होती. पण, ए. के. अँटनीनं हसत उत्तर दिलं, आमच्या चर्चा सुरू आहेत. चीनने घुसखोरी केलेला भाग तेव्हा भारताला मिळाला नाही. असं म्हणत राहुल गांधी कधी हुश्शार होणार?’

पंतप्रधान नरेंद्र मोदी कायर आहेत, त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. काँग्रेसचं सरकार असतं तर १५ मिनिटात चीनला हाकललं असतं असं वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलं होतं. संपूर्ण जगात एकमेव असा देश आहे की ज्या देशात चीनचं सैन्य आलं. भारताची जमीन हडप केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कायर आहेत त्यांनी असं वक्तव्य केलं की भारताची कोणत्याही जमिनीवर चीनने कब्जा केलेला नाही. मात्र सगळ्या देशाला माहित आहे पंतप्रधान काय बोलले होते असंही राहुल गांधींनी म्हटलं होतं.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*