ट्विटर होणार आता बहुभाषिक; पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची माहिती घरबसल्या

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ट्विटर इंडियाने इंग्रजी सोबतच अन्य भाषेत ट्विटर सेवा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.Twitter will now be multilingual Information about the assembly elections in five states went home

येत्या दोन महिन्यात पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या राज्यात निवडणूक होणार आहे. त्यामुळे ट्विटर सेवा इंग्रजी, हिंदी, मल्याळम, तमिळ, बंगाली आणि आसामी भाषेत उपलब्ध करून देण्यात येत आहे.राजकीय नेते आणि मतदार, समाज माध्यमे, नागरिक यांच्यात समन्वय वाढावा, हा त्या मागचा प्रमुख हेतू आहे, असे सांगण्यात आले. निवडणुकीबाबतचा सर्व तपशील, मतदार याद्या, उमेदवार यांच्याबाबतच तपशील मिळेल.

दुसऱ्या टप्प्यात इमोजीच्या माध्यमातून चर्चा घडवून आणली जाईल. नागरिकांना निवडणुकीची खरी माहिती मिळावी, असा प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले असून मतदान यंत्राचा आणि व्हिवीपॅटची माहिती या माध्यमातून दिली जाईल.

Twitter will now be multilingual Information about the assembly elections in five states went home

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*