ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत अकार्यक्षम अध्यक्ष, त्यांना गुप्त माहिती मिळणार नाही – बायडेन


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी अध्यडक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यातील संघर्ष अजूनही मिटण्याचे नाव घेईल अशी स्थिती नाही. ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत अकार्यक्षम अध्यक्ष ठरले आहे, अशी जहरी टीका त्यांनी केली आहे. Trump is the most incompetent president in US history

ट्रम्प यांचा स्वभाव चंचल असल्याने त्यांच्यावर विश्वाआस ठेवता येणार नाही. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची गोपनीय माहिती दिली जाणार नाही, असे बायडेन यांनी सांगत साऱ्या अमेरिकावासियांना धक्का दिला आहे.एका दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर पुन्हा शाब्दिक हल्ला चढविला आहे. बायडेन म्हणतात ट्रम्प यांना गोपनीय माहिती असण्याची गरज असल्याचे मला वाटत नाही. ट्रम्प काही बोलले तर त्यांची जीभ घसरण्याचा धोका कायम असतो.

अमेरिकेत अध्यक्ष पायउतार झाले तरी त्यांना गुप्तचर विभागाकडून मिळालेली माहिती देण्याची परंपरा आहे. आजपर्यंत ती प्रथा व परंपरा पाळली जात आली आहे. त्यामुळे बायडेन यांच्या विधानाने सारेच बुचकाळ्यात पडले आहेत.

Trump is the most incompetent president in US history

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती