टीआरपी घोटाळ्यात ट्विस्ट; ‘हंसा ग्रुप’चा मुंबई पोलिसांवर दबावाचा आरोप! सीबीआय’कडे तपास देण्याची मागणी


  • रिपब्लिकन वाहिनी व अर्णब गोस्वामी विरोधात खोटी साक्ष देण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कथित टीआरपी घोटाळ्यात नवा ट्विस्ट आला असून हंसा रिसर्च ग्रुपने मुंबई पोलीसांवर गंभीर आरोप आरोप केला आहे. रिपब्लिकन मीडिया नेटवर्क विरोधात खोटी साक्ष देण्यासाठी आमच्यावर दबाव आणण्यात आल्याचे हंसा रिसर्च गु्रपने म्हटले आहे. trp scam

हंसा रिसर्च ग्रुपकडून देशातील टीआरपी मोजण्यासाठी घरोघरी बसविलेल्या बारोमीटरचे संचालन केले जाते. या गु्रपने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीसांकडून काढून घेऊन केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्याची मागणी केलीआहे.  trp scam

हंसाने न्यायालयात केलेल्या याचिकेमध्ये म्हटले आहे की मुंबई पोलीसांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांवर खोटी साक्ष देण्यासाठी दबाव आणला जात आहे. त्याचबरोबर रिपब्लिकन टीव्हीने जारी केलेल्या एका पत्रकाला खोटे ठरवावे असे म्हणत आहे.

trp scam

विशेष म्हणजे हंसा रिसर्चच्या तक्रारीवरूनच टीआरपी घोटाळ्यात एपआयआर दाखल करण्यात आली होती. यामध्ये केवळ इंडिया टूडेचा उल्लेख करण्यात आला होता. इंडिया टूडेकडून बारोमीटर लावलेल्या घरात trp scam

परंतु, मुंबंईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन यामध्ये रिपब्लिकन टीव्हीचा समावेश असल्याचे म्हटले होते. त्यावरून रिपब्लिकन टीव्हीच्या कर्मचाऱ्यांची चौकशीही करण्यात आली होती. रिपब्लिकन न्यूज नेटवर्कचे संपादक अर्णब गोस्वामी यांनाही चौकशीसाठी नोटीस काढण्यात आली होती. मात्र, आता हंसा रिसर्च ग्रुपने केलेल्या याचिकेमुळे महाविकास आघाडीकडून गोस्वामी यांच्यावर सूड उगविण्यासाठीच रिपब्लिकन टीव्हीचे नाव यामध्ये गोवण्यात आले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती