आईची सेवा करून त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी घालून दिला आदर्श


चीनी व्हायरसचा ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, घरामध्ये त्यांची काळजी कशी घ्यावी याचे उदाहरण त्रिपुराचे तरुण मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी घालून दिले आहे.


वृत्तसंस्था

आगरतळा : चीनी व्हायरसचा ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, घरामध्ये त्यांची काळजी कशी घ्यावी याचे उदाहरण त्रिपुराचे तरुण मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी घालून दिले आहे.

त्रिपुरामध्ये एक दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. ही घोषणा करताना मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी जनतेला आवाहन केले होते की, आपल्या घरातील वृद्धांची काळजी घ्या. पण ते केवळ सल्ला देण्यापुरतं त्यांनी हे केलं नाही तर त्यांनी याबाबत स्वत: कृतीही केली. बिप्लव देव यांनी रविवारी सकाळी स्वत:च्या घरात स्वयंपाकघरात जाऊन पाणी गरम करायला ठेवले. त्यात आलं ठेचून टाकलं. ते आपल्या आपल्या आईला दिलं.

कोरोनाच्या या काळात वृद्धांनी बाहेर पडू नये असा संदेश अनेक जण देताहेत. पण त्यांची काळजी कशी घ्यावी याचं थेट उदाहरण त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी स्वत: दिलं आहे. त्यांनी आपल्या आईला आलं घातलेलं गरम पाणी तयार करू दिलं आणि सर्व घरातील वृद्धांची काळजी घ्या असा संदेशही दिला आहे.

याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यासोबत दिलेल्या संदेशात बिप्लव देव म्हणतात, आज सकाळी मी आले घालून उकळलेले पाणी आईला दिले. मला आशा आहे की आपणही आपल्या आई-वडीलांची आणि घरातील ज्येष्ठांची काळजी घेत असाल. त्यांना आले घालून गरम पाणी दररोज देत जा. आले रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे असून त्यापासून चीनी व्हायरसला दूर ठेवता येते. त्यांनी नागरिकांना फोटोही शेअर करण्याचे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती