तृणमूलची चाल, अमित शहा-ओवेसी भेटीचा खोटा फोटो केला व्हायरल


पश्चिम बंगालमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता तृणमूल कॉंग्रेसने चाल खेळली असून केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या भेटीचा खोटा फोटो व्हायरल केला आहे. Trinamool’s move fake photo of Amit Shah-Owaisi meeting goes viral


वृत्तसंस्था

कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता तृणमूल कॉंग्रेसने चाल खेळली असून केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या भेटीचा खोटा फोटो व्हायरल केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम मतांवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सारी मदार आहे. मात्र, असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने पश्चिम बंगालमध्ये निवडणुका लढविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुस्लिम मतपेढीला सुरूंग लागण्याची भीती तृणमूल कॉंग्रेसला वाटत आहे.


असदुद्दीन ओवैसी मोहम्मद अली जिनांचे अवतार, तेजस्वी सूर्या यांची टीका


ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच एमआयएमला भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हटले होते. मात्र, पश्चिम बंगालमधील गोरगरीब आणि अशिक्षित मुस्लिमांना भडकाविण्यासाठी अमित शहा आणि ओवेसी यांच्या भेटीचा फोटो व्हायरल केला जात आहे. या फोटोमध्ये अमित शहा म्हणत आहे की असदुद्दीन, मी तुमचा हात पकडून भाई म्हणत आहे. बिहारप्रमाणेच बंगालमध्येही करा. मी तुम्हाला हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे.

Trinamool’s move fake photo of Amit Shah-Owaisi meeting goes viral

गुगल रिव्हर्स इमेजमध्ये सर्च केल्यावर या फोटोचे सत्य उघड होते. वास्तविक हा फोटो २०१४ मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा आहे. फोटोशॉप करून मोदी यांच्या चेहऱ्यावर ओवेसीचा चेहरा लावण्यात आला आहे. अमित शहा आणि ओवेसी यांची कधीही भेट झालेली नाही. मात्र, ओवेसी हे भाजपाच्या सांगण्यावरूनच उमेदवार उभे करत आहेत, असा खोटा प्रचार करण्यासाठी हा फोटो वायरल केला जात आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था