तृणमूल कॉंग्रेसमध्ये केवळ ममतादीदी आणि अभिषेक या दोघांनाच बोलण्याचा अधिकार, पार्टी प्रायव्हेट लिमिटेड झाल्याची अधिकारी यांची टीका

वृत्तसंस्था

नंदीग्राम – तृणमूल कॉंग्रेस पक्ष ही एक खासगी कंपनी बनली आहे. तृणमूल कॉंग्रेसमध्ये केवळ ममतादीदी आणि त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी या दोघांनाच बोलण्याचा अधिकार आहे अशी टीका त्यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक सुवेंदू अधिकारी यांनी केली आहे. Trinamool Congress only Mamata Banerjee and Abhishek have the right to speak party officials sayपश्चिळम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या नंदीग्राम मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी आज दुपारी एकच्या सुमारास उमेदवारी अर्ज भरला. यादरम्यान ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना असेही अधिकारी म्हणाले. ममता बॅनर्जी आता स्पर्धेच्या बाहेर गेल्या आहेत. बंगालमध्ये भाजप विजयाकडे वाटचाल करत आहे. जनता आम्हाला साथ देईल, याचा मला विश्वाेस आहे.

ते म्हणाले. नंदीग्रामच्या लोकांचे माझे जुने नाते आहे. ममता बॅनर्जी या नंदीग्रामच्या लोकांची पाच वर्षानंतरच निवडणुकीच्या काळात आठवण काढतात. आपण ममता बॅनर्जी यांना पराभूत करू. यादरम्यान सुवेंदू यांनी हुतात्मा वेदी यांनाही आदरांजली वाहिली. २००७ मध्ये नंदीग्राम आंदोलनात मृत झालेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ स्मारक उभारले आहे.

Trinamool Congress only Mamata Banerjee and Abhishek have the right to speak party officials say

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*