शेतकरी आंदोलनावरील ट्विटनंतर सचिनचे चाहते समर्थनार्थ उतरले ; सोशल मीडियावर #IstandwithSachin हॅशटॅगचा ट्रेंड


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या एका ट्विटमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. बुधवारी त्याने शेतकरी आंदोलनाशी संबंधित ट्विट केले होते. त्यात त्याने देशाला एकजूट राहण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्याच्यावर टीका झाली होती. त्यामुळे त्याचे चाहते समर्थनार्थ एकवटले आहेत. #IstandwithSachin नावाचा हॅशटॅग सोशल मीडियावर ते ट्रेंड करत आहेत.Trending the hashtag IstandwithSachin on social media

सचिन नावाचा एक फॅन क्लब आहे. त्याचे अनेक चाहते या मोहिमेमध्ये सामील होत आहेत. #IstandwithSachin कडून वारंवार ट्वीट होत आहेत. सध्या तो ट्रेंडमध्ये आहे. सर्व चाहते सचिन सोबत असून भारतरत्न सचिन तेंडुलकरने देशासाठी काय केले, हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.शेतकरी आंदोलनाबाबत आंतरराष्ट्रीय मीडिया आणि परदेशी कलाकारांनी केलेल्या ट्विटनंतर सचिनने बुधवारी देशाला एकजूट राहण्याचा सल्ला देऊन आपला मुद्दा मांडला. पॉप स्टार रिहानाच्या ट्विटनंतर सचिनने हे ट्विट केले होते. तेव्हापासून बरेच लोक त्याच्यावर टीका करत आहेत. त्याविरोधात सचिनच्या समर्थनार्थ अनेक चाहते पुढे आले आहेत.

याबद्दल फॅन क्लबने ट्विट केले असून सचिनने देशासाठी काय केले हे सांगितले. टाइम्स मासिकाचा कोट सचिनबरोबर शेअर केला होता.

Trending the hashtag IstandwithSachin on social media

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था