चोर सोडून संन्याशाला सुळी, मुंबईतील ८६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सचिन वाझेसारख्या राज्यकर्त्यांनीच पोसलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या कृष्णकृत्यांचा फटका मुंबईतील प्रामाणिक अधिकाऱ्यांना बसला आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी ८६ पोलीस अधिका ऱ्यां च्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अनेकांच्या बदल्या गैरसोईच्या ठिकाणी केल्याने पोलीस अधिकाऱ्यांत नाराजी आहे. Transfer of 86 police officers in Mumbai


विशेष प्रतिनिधी

मुंबई: सचिन वाझेसारख्या राज्यकर्त्यांनीच पोसलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या कृष्णकृत्यांचा फटका मुंबईतील प्रामाणिक अधिकाऱ्यांना बसला आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी ८६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अनेकांच्या बदल्या गैरसोईच्या ठिकाणी केल्याने पोलीस अधिकाऱ्यांत नाराजी आहे. Transfer of 86 police officers in Mumbai

पोलीस दलातील बदल्या या साधारणत: मे महिन्यात केल्या जातात. त्यामुळे मुलांच्या शाळांचा प्रश्न निर्माण होत नाही. परंतु, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी मुंबई क्राइम ब्रांचमधील निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला झालेली अटक, त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची करण्यात आलेली उचलबांगडी आणि पाठोपाठ परमबीर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टाकलेला लेटरबॉम्ब अशा स्फोटक घटनाक्रमानंतर मुंबई पोलीस दलात मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत.गुन्हे शाखेतील तब्बल ६५ अधिकाऱ्यांची अन्यत्र पाठवणी करण्यात आली असून त्यात निलंबित सचिन वाझे यांच्या सीआययु युनिटचे एपीआय रियाझुद्दीन काझी व प्रकाश होवाळ यांचीही बदली करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेच्या सीआययू पथकातील अधिकारी सचिन वाझे यांच्यामुळे संपूर्ण मुंबई पोलीस दल अडचणीत सापडल्यामुळे मंगळवारी निरीक्षक, सहायक निरिक्षक, उपनिरीक्षक दर्जाच्या ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये गुन्हे शाखेच्या ६५ पोलिसांचा समावेश आहे. अ‍ॅँंटिलिया स्फोटकं प्रकरण आणि त्यानंतर मनसुख हिरन यांची हत्या यामध्ये सचिन वाझे याच्यासह काही पोलिसांचा सहभाग आढळल्याने मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन झाली.

मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा सांभाळल्यानंतर हेमंत नगराळे यांनी पोलीस दलात फेरबदल करण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार मंगळवारी ८६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. सीआययू मधील सचिन वाझे यांचे सहकारी आणि एनआयएच्या चौकशीला सामोरे गेलेले एपीआय रियाझुद्दीन काझी यांची सशस्त्र दलात तर प्रकाश होवाळ यांची मलबार हिल पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

वर्षानुवर्षे गुन्हे शाखेत ठाण मांडून बसलेल्या काही अधिकाऱ्यांना हटविण्यात आले आहे. मात्र, प्रामाणिक अधिकाऱ्यांना या बदल्यांचा फटकाबसला आहे. अनेकांच्या निवासस्थानापासून दूर बदल्या झाल्या आहेत.

Transfer of 86 police officers in Mumbai

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*