अभिव्यक्ती स्वातंत्र्य पायदळी तुडविले; अभिनेत्री कंगनाचा आरोप, ट्विटरच्या सीईओवर आगपाखड


वृत्तसंस्था

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतने ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जॅक डोर्सी यांच्यावर आगपाखड केली आहे.
अमेरिकी संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तिने हे भाष्य केलं. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या छिथावणीखोर ट्विट केल्याने त्यांच ट्विटर अकाऊंट कायमचं बंद केल. आता या वादात कंगनानेही उडी घेतली आहे. Trampled on freedom of expression; Actress Kangana accused of firing on Twitter CEO

कंगनाने ट्वीटमध्ये जॅक डोर्सीचं 2015 मध्ये केलेल्या एका ट्वीटला क्वोट केलं आहे. ज्यात त्यानं लिहिलं होतं की – ‘ट्विटर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो. सत्तेच्या विरोधात खरं बोलणाऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. परस्पर संवाद मजबूत करण्याला आम्ही पाठिंबा देतो.’

कंगनाने या ट्विटला क्वोट करत लिहिलं की- ‘तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा देत नाहीत, इस्लामिक देशांनी आणि चिनी प्रोपगंडासोबत तुम्ही पूर्णपणे विकले गेले आहात. तुम्ही फक्त आपल्या फायद्याच्या बाजूने उभे आहात. तुम्ही इतरांच्या मतांबद्दल असहिष्णुता दर्शवत आहात. तुम्ही तुमच्या लोभांचे गुलाम झाले आहात. त्यामुळं केवळ मोठं मोठे दावे करू नका, हे खूप लज्जास्पद आहे. ‘

Trampled on freedom of expression; Actress Kangana accused of firing on Twitter CEO

ट्विटरच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीवर किंवा व्यवस्थेवर निशाणा साधण्याची ही कंगनाची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिने अनेकांना ट्रोल केलं आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती