Tractor Rally Violence Reward of Rs 1 lakh on four persons including Mastermind Deep Sidhu

Tractor Rally Violence : मास्टरमाइंड दीप सिद्धूसह चार जणांवर 1 लाख रुपयांचे इनाम

26 जानेवारीला दिल्लीच्या लाल किल्ल्यात तिरंग्याऐवजी दुसरा ध्वज फडकवण्याचा आणि हिंसाचाराला कारणीभूत असल्याचा आरोप असलेला अभिनेता दीप सिद्धू अद्याप फरार आहे. दीप सिद्धूच्या अटकेसाठी दिल्ली पोलिस छापेमारी करत आहेत. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी दीप सिद्धूची माहिती देणाऱ्यांना 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. Tractor Rally Violence Reward of Rs 1 lakh on four persons including Mastermind Deep Sidhu


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : 26 जानेवारीला दिल्लीच्या लाल किल्ल्यात तिरंग्याऐवजी दुसरा ध्वज फडकवण्याचा आणि हिंसाचाराला कारणीभूत असल्याचा आरोप असलेला अभिनेता दीप सिद्धू अद्याप फरार आहे. दीप सिद्धूच्या अटकेसाठी दिल्ली पोलिस छापेमारी करत आहेत. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी दीप सिद्धूची माहिती देणाऱ्यांना 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

दीप सिद्धू व्यतिरिक्त दिल्ली पोलिसांनी जुगराज सिंह, गुरजोत सिंह आणि गुरजंत सिंग यांच्यावरही एक लाखांचे इनाम ठेवले आहे. तर जजबीरसिंग, बूटा सिंग, सुखदेव सिंग आणि इक्बाल सिंग यांच्याविषयी माहिती देणार्‍यांना दिल्ली पोलिसांनी प्रत्येकी 50,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.दिल्लीत जेव्हा हिंसाचार सुरू होता, तेव्हा पंजाबी अभिनेता दीप सिद्धू स्वतः लाल किल्ल्यात हजर होता. दीप सिद्धूने चिथावणीखोर भाषणही दिले होते. मात्र, हिंसाचारानंतर तो फरार झाला आहे. पोलिसांनी दीप सिद्धूविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. त्याच्याविरुद्ध लूकआउुट नोटीसही जारी करण्यात आलेली आहे. पोलीस आयुक्तांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, हिंसाचारात सहभागी असणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही.

Tractor Rally Violence Reward of Rs 1 lakh on four persons including Mastermind Deep Sidhu

दीप सिद्धू फरार असला तरी सोशल मीडियावर मात्र सक्रिय आहे. दिल्लीहून पळून गेल्यानंतर दीप सिद्धू हरियाणात होता, नंतर पंजाबात गेला. यानंतर तो बिहारमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, परंतु अद्याप तो हाती लागलेला नाही. सध्या पोलिसांची अनेक पथके त्याचा शोध घेत आहेत. लवकरच त्याला अटक केली जाईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.

Tractor Rally Violence Reward of Rs 1 lakh on four persons including Mastermind Deep Sidhu

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*