बॅरिकेड तोडताना ट्रॅक्टर उलटला; आंदोलक शेतकऱ्याने प्राण गमावला


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनातला सगळ्यात हिंसक प्रकार सायंकाळी घडला. आयटीओ परिसरात पोलिसांनी लावलेले बॅरिकेड तोडताना ट्रॅक्टर उलटला आणि त्यातच आंदोलक शेतकऱ्याला आपले प्राण गमवावे लागले. दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली. tractor overturned while breaking the barricade agitating farmer lost his life

शेतकरी आंदोलन झाल्यानंतर पोलिसांना आज दुपारी लाल किल्ला, ननगोळी परिसरात आंदोलकांवर लाठीमार करावा लागला. पण आंदोलन आणखी चिघळू नये आणि त्याचा वणवा इतरत्र पेटू नये, यासाठी दिल्लीतली आणि एनसीआर परिसरातली नेटसेवा काही काळापुरती आणि काही ठिकाणी बंद केली आहे. ग्रे लाइनच्या सर्व मेट्रो स्टेशनची सर्व एन्ट्री आणि एक्झिट गेट बंद करावी लागली.शेतकरी आंदोलक हिंसक होऊन पोलिसांवर ट्रॅक्टर घातले. आंदोलन शेतकरी नेत्यांच्या हाताबाहेर गेले. शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकैत, योगेंद्र यादव मात्र कानावर हात ठेवताना दिसले. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिस प्रचंड संयमी भूमिका घेऊन आंदोलकांना हाताळताना दिसले. तरी आंदोलक शेतकऱ्यांच्या आक्रस्ताळेपणामुळे एका शेतकऱ्याला प्राण गमवावे लागले.

आयटीओ परिसरात आंदोलकांनी ट्रॅक्टर अतिशय वेगाने घुसविला. त्याने बॅरिकेड तोडले. पण वेगाच्या भरात ट्रॅक्टर उलटला. त्यात आंदोलक शेतकऱ्याला प्राण गमवावे लागले.

tractor overturned while breaking the barricade agitating farmer lost his life

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था