शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धनसाठी 23 कोटी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती


वृत्तसंस्था

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धनसाठी 23 कोटीचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.Tourism Minister Aditya Thackeray23 crore conservation Shivneri fort Information

राज्यातील पराक्रमाचे प्रेरणास्थान गड आणि किल्ले आहेत. या किल्ल्यांचे जतन, संवर्धन करणे काळाची गरज आहे. तसेच पर्यटनासाठी गडकिल्ले महत्वाची भूमिका बजावू शकतात.यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा एक भाग म्हणून शिवनेरीचा विकास केला जात आहे. यासाठी 23 कोटींच्या निधीस मान्यता दिली आहे. या निधीतून शिवनेरीचे ऐतिहासिक महत्त्व जपण्याबरोबरच पर्यटनाच्या दृष्टीने किल्ल्याचा विकास केला जाईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. पुरातत्व विभाग, वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ही कामे केली जाणार आहेत.

Tourism Minister Aditya Thackeray23 crore conservation Shivneri fort Information

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था