Total Lockdown in Beed Nanded District For 11 days, From March 26 to April 4

Total Lockdown : बीड आणि नांदेड जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर, वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारचा निर्णय

Total Lockdown in Beed and Nanded : राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शासनाने बीड आणि नांदेड जिल्ह्यात 26 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले आहे. नागपूर, मुंबई, पुणे आणि औरंगाबादव्यतिरिक्त बीड व नांदेड जिल्ह्यातही कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले. यापूर्वी नागपुरातही १ ते २१ मार्चदरम्यान प्रशासनाने लॉकडाऊन लावले होते. महाराष्ट्रातील बर्‍याच जिल्ह्यांत नाइट कर्फ्यू लागू आहे. 11 दिवसांच्या लॉकडाऊनदरम्यान सर्व मंगल कार्यालये, हॉटेल आणि रेस्टॉरंट्स बंद राहतील. याशिवाय सर्व शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. Total Lockdown in Beed Nanded District For 11 days, From March 26 to April 4


विशेष प्रतिनिधी

बीड/नांदेड :  राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शासनाने बीड आणि नांदेड जिल्ह्यात 26 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले आहे. नागपूर, मुंबई, पुणे आणि औरंगाबादव्यतिरिक्त बीड व नांदेड जिल्ह्यातही कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले. यापूर्वी नागपुरातही १ ते २१ मार्चदरम्यान प्रशासनाने लॉकडाऊन लावले होते. महाराष्ट्रातील बर्‍याच जिल्ह्यांत नाइट कर्फ्यू लागू आहे. 11 दिवसांच्या लॉकडाऊनदरम्यान सर्व मंगल कार्यालये, हॉटेल आणि रेस्टॉरंट्स बंद राहतील. याशिवाय सर्व शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

खासगी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले असून कर्मचाऱ्यांनी घरातून काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तथापि, दूध, औषध, भाज्या आणि रेशन यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने या काळात खुली असतील. राज्यात ठिकठिकाणी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसून येत आहे.

मंगळवारी राज्यात 28 हजारांहून जास्त नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 132 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या आता 53,589 वर पोहोचली आहे.

अनेक ठिकाणी निर्बंध

नागपूर, पुणे, मुंबई, अहमदनगर, औरंगाबादसह राज्यातील सर्व जिल्ह्यांत निर्बंध घालण्यात आले आहेत. मंगळवारी महापालिकेने होळीसंदर्भात एक आदेश जारी केला होता. यात सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करण्यास परवानगी नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरातमधील 4 शहरांतही नाइट कर्फ्यू लागू आहे, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील अनेक शहरांतही निर्बंध आहेत. पंजाबात 12 जिल्ह्यांमध्ये नाइट कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय दिवसभरात एक तास वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

Total Lockdown in Beed Nanded District For 11 days, From March 26 to April 4

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*