Paramavir letterbomb; शरद पवारांना सगळे माहितीय, त्यांनीच कारवाई करावी ना…!!; परखड बोल सुनावत ज्युलिओ रिबेरोंनी पवारांची चौकशीची सूचना फेटाळली

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – सचिन वाझे – परमवीर सिंग आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणाची चौकशी टॉप कॉप ज्युलिओ रिबेरोंनी करावी, अशी सूचना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली होती. परंतु, अत्यंत परखड बोल सुनावत ज्युलिओ रिबेरो यांनी पवारांची ती सूचना फेटाळून लावली. Top Cop Julio Ribeiro rejected suggestion by sharad pawar to inquire into matter of 100 cr extortion by Anil Deshmukh

मला कोणी अद्याप संपर्क केलेला नाही. मी ९२ वर्षांचा आहे. मला कशाला असल्या राजकीय आणि भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करायला सांगता… खुद्द शरद पवारांना सगळे माहितीय. ते एका पक्षाचे प्रमुख आहेत. ते पक्ष चालवतात. त्यांनीच या प्रकरणात कारवाई करावी ना… लोकांनाही सगळे माहिती झालेय… लोक त्यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळलेत, असे परखड बोल रिबेरो यांनी सुनावले.परमवीर सिंग – अनिल देशमुखांच्या चौकशीसाठी तुम्ही दुसऱ्या कोणाचे नाव सूचवाल का…, असे एनडीटीव्हीच्या पत्रकाराने विचारले असता, रिबेरो ताडकन उत्तरले, की कोणतीही सज्जन आणि सभ्य व्यक्ती असल्या घाणेरड्या धंद्यांच्या आणि प्रकरणांच्या चौकशीच्या फंदात पडणार नाही आणि मी कशाला कोणाचे नाव सूचवू, त्यांचे त्यांनी बघावे, असे परखड बोलही त्यांनी ऐकविले.

सचिन वाझे आणि तथाकथित एन्काउंटर स्पेशालिस्ट हे वर्दीतले गुन्हेगार आहेत, असा गंभीर आरोप रिबेरो यांनी केला. त्याच बरोबर बदली आणि नियुक्त्यांचे मोठे रॅकेट राजकारण्यांच्या बरोबरीने आयपीएस अधिकारी चालवतात, यामुळे माझ्यासारख्या प्रामाणिक व्यक्तीची मान शरमेने खाली जाते, अशा शब्दांमध्ये खडे त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारण्यांचे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे वाभाडे काढले.

तत्पूर्वी, दुपारी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी परमवीर सिंग – अनिल देशमुख प्रकरणात ज्युलिओ रिबेरोंसारख्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडून चौकशी करण्याची सूचना केली होती. ती सूचना रिबेरोंनी ठाम शब्दांमध्ये फेटाळून लावली.

-शरद पवारांचे पत्रकार परिषदेतले वक्तव्य

गृहमंत्र्यांनी दर महिन्याला १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप या परमवीर सिंगांच्या पत्रात आहे. त्यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना आणि मला पाठवले आहे. यात पैसे गोळा कसे केले जातात आणि ते कुणाकडे दिले जाते यात नमूद करण्यात आलेले नाही. देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर ते पत्र समोर आले. हे संपूर्ण प्रकरण गंभीर आणि संवेदनशील बनत आहे. त्यामुळे याची एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी. राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र महाविकासआघाडी सरकार स्थिर आहे. याचा कोणताही विपरित परिणाम सरकारवर होणार नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले.

Top Cop Julio Ribeiro rejected suggestion by sharad pawar to inquire into matter of 100 cr extortion by Anil Deshmukh

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*