उद्या हे लोक परमबीर सिंग यांचा मेंदू भाजपने हॅक केला असेही म्हणतील, सुधीर मुनगंटीवार यांची टीका

उद्या हे लोक परमबीर सिंग यांचा मेंदू भाजपने हॅक केला असेही म्हणतील, अशी टीका भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली आहे.  Tomorrow these people will also say that BJP hacked Parambir Singh’s brain, criticizes Sudhir Mungantiwar


विशेष प्रतिनिधी

मुंबई: उद्या हे लोक परमबीर सिंग यांचा मेंदू भाजपने हॅक केला असेही म्हणतील, अशी टीका भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत येऊन गेल्यानंतर परमबीर सिंग यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. पवार यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले,शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही.उद्या हे लोक असेही म्हणतील की परमबीर सिंग यांचा मेंदू भाजपवाल्यांनी हॅक केला म्हणून. त्यामुळे बिनबुडाचे आरोप शरद पवार यांनी करू नये. आधी या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यानंतरच या प्रकरणाची चौकशी सुरू करावी.

परमबीर सिंग यांनी पत्रात केलेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी वसुलीच्या टार्गेटचे पत्रात म्हटले आहे. पण हा पैसा गेला कुठे हे मात्र सांगितलेले नाही. फडणवीसही दिल्लीला येऊन गेले होते. ते राज्यात परत आल्यानंतर परमबीर सिंग यांनी पत्र लिहिले, असे शरद पवार यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

Tomorrow these people will also say that BJP hacked Parambir Singh’s brain, criticizes Sudhir Mungantiwar

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*