ठाकरे-पवार सरकार पुरते बेजार, परमबीर सिंगांपाठोपाठ आणखी एक आयपीएस अधिकारी न्यायालयात जाणार


पोलीस दल चालविताना आपपरभाव करणाऱ्या ठाकरे-पवार सरकारविरोधात आणखी एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी न्यायालयात जाणार आहे. आपल्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्यावर आपल्या वरती नेमल्याची तक्रार या अधिकाऱ्याने केली आहे. Tired of Thackeray-Pawar government another IPS officer to go to court after Parambir Singh


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पोलीस दल चालविताना आपपरभाव करणाऱ्या ठाकरे-पवार सरकारविरोधात आणखी एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी न्यायालयात जाणार आहे. आपल्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्यावर आपल्या वरती नेमल्याची तक्रार या अधिकाऱ्याने केली आहे.

महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात ज्येष्ठ असलेले आयपीएस अधिकारी संजय पांडे यांनी सरकारच्या बदलीच्या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी बदलीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर आता महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये बदली केलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे हे देखील मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावणार आहेत.१९८६ च्या बॅचचे म्हणजेच सर्वात वरिष्ठ असूनही पांडे यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांनी राज्य सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. ज्येष्ठता डावल्याने आता संजय पांडे राज्य सरकारविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्रातील सर्वात वरिष्ठ अधिकाºयांपैकी संजय पांडे एक आहेत. परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी उचलबांगडी केल्यानंतर मुंबईचे आयुक्तपद रिक्त झाले. त्यानंतर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी असलेले हेमंत नगराळे यांना मुंबईच्या पोलीस आयुक्त पदासाठी नियुक्त करण्यात आले. महासंचालक पदी रजनीश शेठ यांची नियुक्ती केली.

तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी संजय पांडे यांच्याकडे देण्यात आली. संजय पांडे यांच्या तुलनेने त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असणाºया अधिकाऱ्याला महासंचालक नेमण्यात आले. रजनीश सेठ हे १९८८ च्या बॅचचे अधिकारी आहेत. यामुळे संजय पांडे नाराज झाले असून आपल्यावर अन्याय होत असल्याचे ते म्हणाले.

संजय पांडे म्हणाले की, राज्य सरकार ज्या पद्धतीनं काम करत आहे, ते पोलीस खात्याच्या आदर्शवादाला खाली खेचत आहे. त्याचबरोबर एक सक्षम अधिकारी असूनही, त्यांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करणं कुठे ना कुठेतरी सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.’

Tired of Thackeray-Pawar government another IPS officer to go to court after Parambir Singh

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती