फडणवीसांचा फॉलोअप अन् मोदींची संवेदनशीलता… चिमुरडी तीराच्या दुर्मिळ आणि महागड्या औषधांसाठी केंद्राने केले तब्बल साडेसहा कोटी रुपयांचा कर माफ

मुंबईतील तीरा कामत या पाच महिन्यांच्या चिमुकलीवर उपचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी धावून आले आहे. तीरावर उपचारसााठी लागणाऱ्या १६ कोटी रुपयांच्या औषधावर आकारण्यात येणारे सर्व कर माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. फडणवीस यांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि त्याला तितक्याच तत्परतेने पंतप्रधानांनी दिलेला प्रतिसाद यामुळे तीरावरील उपचाराचा मार्ग प्रशस्त झाला आहे. tira kamat treatment on the shores of small baby sensitivity of devendra Fadnavis


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील तीरा कामत या पाच महिन्यांच्या चिमुकलीवर उपचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी धावून आले आहे. तीरावर उपचारसााठी लागणाऱ्या १६ कोटी रुपयांच्या औषधावर आकारण्यात येणारे सर्व कर माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

फडणवीस यांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि त्याला तितक्याच तत्परतेने पंतप्रधानांनी दिलेला प्रतिसाद यामुळे तीरावरील उपचाराचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

तीरा कामत या ५ महिन्यांच्या बालिकेला जीन रिप्लेसमेंट उपचारांची गरज आहे. त्यासाठी लोकांच्या देणग्यांमधून सुमारे १६ कोटी रुपये गोळा करण्यात आले. पुढील उपचारासाठी झोलजेन्स्मा हे औषध अमेरिकेतून आयात करावे लागणार होते.

मात्र हे औषध भारतात आणण्यासाठी जीएसटी, कस्टम करांसह सुमारे ६.५ कोटी रुपये आणखी खर्च येणार होता. त्यामुळे तीराच्या पालकांनी त्यातून सूट मागण्यासाठी राज्य सरकार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पाठपुरावा केला. त्यानुसार या औषधावरील या सर्व करांतून सूट मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी १ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्यासंबंधीची विनंती केली.फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्राची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ दखल घेत पूर्ण करमाफी दिली. पंतप्रधान मोदी यांनी ही तातडीची बाब असल्याचे लक्षात घेऊन तसे लगेचच निर्देश दिले. त्यावर वेगाने कार्यवाही झाली आणि तिराच्या औषधांवरचा सर्व कर माफ करणारा आदेश वित्त विभागाने जारी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानताना म्हटले आहे की, पंतप्रधानांनी अतिशय संवेदनशीलतेने पुढाकार घेत त्वरेने कार्यवाही केल्यामुळे तीरा कामत हिचे प्राण वाचतील. तीरा कामत हिला उत्तम आरोग्य आणि दीघार्युष्य लाभो.

tira kamat treatment on the shores of small baby sensitivity of devendra Fadnavis

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*