- फेसबुक, ट्विटरवर चीनमध्ये बंदी आहे, मग अमेरिकेत टिक टॉकला परवानगी का?
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : चीनी अॅप टिक टॉकवर भारताने बंदी घातली असून अमेरिकेनेही त्याच प्रकारची भूमिका घेऊन टिक टॉकवर बंदी घालावी, असे मत सिलिकॉन व्हॅलीमधून व्यक्त होत आहे.
फेसबुक, ट्विटरवर चीनमध्ये बंदी आहे, असे असताना अमेरिकेत टिक टॉकला परवानगी का दिली जाते, भारताप्रमाणे अमेरिकेतही टिक टॉकवर बंदी घातली पाहिजे, असे मत टीआयईचे माजी अध्यक्ष व्यंकटेश शुक्ला, क्युबा-अमेरिकन म्युझिक व्हिडीओचे संचालक रॉबी स्टारबक यांनी व्यक्त केले आहे.
चीनची सोशल मीडिया टेक्नॉलॉजी क्षेत्रातील दादागिरी मोडायला पाहिजे. भारत सरकारने याची सुरवात करून दिली आहे. अमेरिका आणि अन्य देशांमधीस सरकारांनी यातून धडे घेऊन चीनी दादागिरी मोडून काढली पाहिजे, असे मत शुक्ला आणि स्टारबक यांनी व्यक्त केले.