रायगडावरचे तिकीटघर शिवभक्तांनी हटविले ; सुविधा न देताच वसुली सुरु असल्याचा आरोप

वृत्तसंस्था

मुंबई : रायगडावर पुरातत्व विभागाने उभारलेले तिकीटघर शिवभक्तांनी मंगळवारी (ता.2) हटविले आहे. कोणत्याही सुविधा न पुरविता करवसुली केली जात होती, असा आरोप शिवभक्तांनी पुरातत्व विभागावर केला आहे.ticketing house at Raigad was removed by the Devotees of Shiva Allegations of recovery without providing facilities

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडावर पुरातत्त्व विभागाने चित्त दरवाजाजवळ तिकीट घर उभारले होते. त्याद्वारे रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांकडून प्रत्येकी 25 रुपये आकारले जात होते.मात्र, पुरेशा सुविधा न देताच तिकिटांची आकारणी केली जात होती. त्यामुळे शिवभक्त संतप्त झाले होते. त्यांनी याबाबत वारंवार आवाजही उठविला होता. परंतु पुरातत्व विभागाने दखल घेतली नाही. त्यामुळे ते तिकीटघर शिवभक्तांनी आज उखडून टाकून रायगडच्या दरीत ढकलून दिले आहे.

पुन्हा उभारल्यास ते टकमक टोकावरून ढकलून देऊ ,असा इशारा दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी महाड पोलिस ठाण्यात पुरातत्व विभागाने तक्रार केली आहे.

ticketing house at Raigad was removed by the Devotees of Shiva Allegations of recovery without providing facilities

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*