तिबेटच्या निर्वासित पंतप्रधानांना अमेरिकेत प्रथमच अधिकृत निमंत्रण

  • परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांशी प्रथमच चर्चा
  • निर्वासित सरकारला अधिकृत मान्यता देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : अमेरिकेने परराष्ट्र धोरणासंदर्भात इतिहास घडवला. तिबेटच्या निर्वासित सरकारचे प्रमुख पंतप्रधान लोबसँग सँग्ये यांना प्रथमच अधिकृत निमंत्रण देऊन अमेरिकेत चर्चेसाठी पाचारण करण्यात आले.

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातील सचिव आणि तिबेटियन अफेअर समन्वयक रॉबर्ट ए. डेस्ट्रो यांनी पंतप्रधान लोक लोबसँग यांच्याशी अमेरिका – तिबेट यांच्यातील राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंधाबाबत चर्चा केली. अमेरिकेने तिबेटच्या निर्वासित सरकारला अधिकृत मान्यता देण्याच्या दिशेने हे पाऊल मानले जाते.

लोबसँग हे तिबेटी निर्वासित सरकारचे प्रमुख मानले जात असून ते भारतातील धर्मशाला येथून तिबेटचे सरकार चालवतात. तिबेटी सर्वोच्च धर्मगुरु दलाई लामा यांच्या मार्गदर्शनाखाली हे सरकार चालते चीनच्या माओवादी कम्युनिस्ट सरकारने तिबेटमध्ये नेमलेले प्रशासन लोबसँग यांच्या सरकारला मान्य नाही.

लोबसँग यांचे सरकार चीनची मध्यममार्गाने वाटाघाटी करून तिबेटच्या प्रश्नावर सन्मानजनक मार्ग काढू इच्छिते. अमेरिकेने निर्वासित सरकारच्या पंतप्रधानांना अधिकृतरीत्या निमंत्रण देऊन या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकल्याचे मानण्यात येते.

रॉबर्ट ए. डेस्ट्रो यांच्याशी दोन्ही देशांच्या संबंधाबाबत व्यापक विचार-विनिमय झाल्याचे छायाचित्र स्वतः पंतप्रधान लोकसंख्या लोबसांग यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहे. अमेरिकेने चीनवर दबाव आणून तेथील माओवादी कम्युनिस्ट सरकारने धर्मगुरू दलाई लामा यांच्याशी चर्चा करून तिबेटच्या गंभीर प्रश्नावर मध्यममार्गाने तोडगा काढावा असे आवाहन लोबसँग यांनी केले.

लोबसँग यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक अँप यांचेही आभार मानले आहेत. अमेरिका आणि तिबेट यांचे संबंध भविष्यकाळात अधिक मजबूत होतील, असा विश्वास लोबसँग आणि डेस्ट्रो यांनी व्यक्त केला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*