तीन इंजिनीअर तरुण ग्रामीण भागाचे ‘सेहत साथी’ ; डिजिटल हेल्थकेअर स्टार्टअप ‘मेडकार्डस’ एक भन्नाट कल्पना


  • मेडकार्डची दोन मॉडेल्स – पहिले रुग्णांसाठी आणि दुसरे मेडिकल स्टोअरसाठी
  • देशाची आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या काळात अधिक दृढ झाली. या पार्श्वभूमीवर ग्रामिण भागात आरोग्य यंत्रणा आणखी मजबूत करण्यासाठी तीन इंजिनीअर तरुण सरसावले.
  • 2017 मध्ये मेडकॉर्डस् स्टार्टअपचा श्रीगणेशा झाला.श्रेयांस मेहता, निखिल बाहेती आणि सईदा धनावत यांची भन्नाट कल्पना .
  • 5000 हून अधिक स्पेशालिस्ट डॉक्टर्सचं नेटवर्क ,13 हून अधिक राज्यांतल्या 30 लाखांहून अधिक कुटुंबांपर्यंत पोहोच.स्मार्टफोन नसेल तर टेलिमेडिसीनद्वारे फोनवरून सल्ला ,आतापर्यंत 40 लाखांचा निधी यासाठी जमवला Three engineers young rural ‘health companions’; Digital healthcare startup ‘MedCards’ is an abandoned idea

विशेष प्रतिनिधी

कोटा : अभियांत्रिकीचा अभ्यास केल्यानंतर, तीन मित्र श्रेयांश मेहता, निखिल बाहेती आणि सईदा धनवत यांना भारताची कमकुवत आरोग्य सेवा आणि छोट्या शहरे व ग्रामीण भागातील रुग्णांच्या समस्यांना दूर करण्यासाठी एक भन्नाट कल्पना सुचली.त्यांनी डिजिटल हेल्थकेअर स्टार्टअप मेडकार्डस सुरू केले. हे स्टार्टअप दोन प्रकारे आरोग्य सेवा प्रणालीच्या अर्थव्यवस्थेत योगदान देत आहे. प्रथम, ते ग्रामीण भागातील रूग्णांना कमी खर्चात डॉक्टरांच्या विस्तृत नेटवर्कद्वारे ऑनलाईन समुपदेशन देत आहे.

दुसरे म्हणजे, स्थानिक फार्मसी हा व्यवसाय डिजिटल बनवून मोठा विस्तृत करण्यात मदत करत आहे. यासह रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत. 2017 मध्ये सुरू झालेल्या मेडकार्डनेही जवळजवळ तीन वर्षांत 4 दशलक्ष डॉलर्सचा निधी उभा केला आहे.

श्रेयांस मेहता, निखिल बाहेती आणि सईदा धनावत (Shreyans Mehta, Nikhil Baheti, Saeda Dhanawat) अशी राजस्थानातल्या कोटा शहरातल्या त्या तीन इंजिनीअर तरुणांची नावं आहेत. ग्रामीण भागातल्या, तसंच छोट्या शहरांतल्या रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे.

हे स्टार्टअप ग्रामीण भागातल्या रुग्णांना डॉक्टर्सच्या व्यापक नेटवर्कशी जोडतं. तसंच, स्थानिक औषध विक्रेत्यांना डिजिटल माध्यमावर आणून त्यांच्या व्यापारवृद्धीला हातभार लावतं आहे. अशा दोन्ही बाजूंनी हे स्टार्टअप उत्तम काम करतं आहे. फायनान्शियल एक्स्प्रेसने त्यांच्या या उपक्रमाबद्दलचं वृत्त दिलं आहे.

कंपनीचा सीईओ श्रेयांस मेहता याने या कंपनीची सुरुवात कशी झाली, याबद्दल सांगितलं, ‘आम्ही तिघेही इंजिनीअर आहोत. मी डॉक्टर्सच्या परिवारातला आहे. तसंच, निखिल हा माझा मित्र हॉस्पिटलजवळ राहतो. त्यामुळे रुग्णांच्या समस्या आम्ही रोज बघायचो. त्यातून आम्ही तिघांनी एकत्र येऊन चर्चा केली आणि हा मार्ग दिसला. मे 2017मध्ये आम्ही राजस्थानातल्या कोटा शहरातून काम सुरू केलं.आरोग्य यंत्रणेतल्या कमतरता शोधण्यासाठी आम्ही राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा राज्यांतल्या 800हून अधिक ठिकाणी फिरलो. त्यानंतर आम्ही पुढचं कार्य सुरू केलं. आमच्या आयु (Ayu) या अॅपद्वारे रुग्णांसाठी डॉक्टर्सचं नेटवर्क उपलब्ध आहे. 5000 हून अधिक स्पेशालिस्ट डॉक्टर्सचं एक नेटवर्क उभारण्यात आलं आहे. त्याद्वारे 13हून अधिक राज्यांतल्या 30 लाखांहून अधिक कुटुंबांपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही त्यांना टेलिमेडिसीनद्वारे फोनवरून सल्ला घेता येऊ शकतो.

सेहत साथी अॅपवर 25 हजारांहून अधिक मेडिकल स्टोअर्स जोडलेली आहेत. त्यावरून एका क्लिकवर औषधं मागवता येतात. मेडिकल स्टोअर्सनाही व्यापारवृद्धीसाठी याचा उपयोग होतो,’ असं श्रेयांसने सांगितलं.

‘डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करताना माझ्या वडिलांना येत असलेल्या अनुभवांचा मला उपयोग झाला. त्यामुळे समस्या कळत गेल्या. ग्रामीण भागातल्या रुग्णांच्या रेकॉर्डचं डिजिटायझेशन सुरू केलं आणि ग्रामीण भागात टेलिकन्सल्टेशन सुविधाही सुरू केली. त्या वेळी छोट्या शहरांत स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या कमी होती; मात्र नंतरच्या काळात त्यात वाढ होत गेली आणि आमचं काम सोपं झालं. आयु या अॅपबरोबरच आम्ही वेब व्हर्जनही उपलब्ध आहे,’ असंही ते म्हणाले.

वॉटरब्रिज, इन्फोएज, असटार्क, राजस्थान व्हेंचर कॅपिटल फंड आदींच्या माध्यमातून आतापर्यंत 40 लाखांचा निधी यासाठी गोळा करण्यात आला आहे. येत्या तीन वर्षांत पाच कोटीहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने निधी उभारण्याचं त्यांचं नियोजन सुरू आहे. गरजू रुग्णांपर्यंत जास्तीत जास्त चाळीस मिनिटांत डॉक्टर्स आणि औषधांची सेवा पोहोचवली जाणं, हे आपलं वैशिष्ट्य असल्याचं श्रेयांसने सांगितलं. एवढी वेगवान सेवा अन्य कोणाचीही नसल्याचंही त्याने अभिमानाने नमूद केलं. रोज पाच हजार लोक आपल्या या व्यासपीठाशी जोडले जात असल्याचंही त्याने सांगितलं.

‘आयु अॅप अँड्रॉइड युझर्ससाठी मोफत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी आठवड्याचं प्राथमिक शुल्क केवळ 99 ते 120 रुपये आहे. एका क्लिकवर रुग्ण डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकतात. आयु कार्डद्वारे वार्षिक सदस्यत्व देण्याची योजना आहे. तसंच, आरोग्य विम्यासह आरोग्याशी संबंधित अन्य गोष्टींची माहिती ब्लॉग आणि व्हिडिओद्वारे दिली जाते,’ अशी माहिती श्रेयांसने दिली.

Three engineers young rural ‘health companions’; Digital healthcare startup ‘MedCards’ is an abandoned idea

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था