हे तर वातावरणातील बदलांचे दुष्परिणाम ; अमेरिकन संशोधकांचा धक्कादायक खुलासा ; भविष्यात चमोलीसारख्या नैसर्गिक आपत्तींत वाढ

उत्तराखंडमधील हिमकडा कशामुळे कोसळला? याबद्दलचा खळबळजनक दावा अमेरिकेच्या संशोधकांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील जोशीमठ येथे मोठा अपघात झाला. उत्तराखंडच्या जोशीमठात हिमस्खलनं झाल्यानं धरण फुटलं. या धरण फुटीमुळे पाण्याच्या प्रवाहाला गती मिळून या पर्वताच्या खालच्या भागात मोठं नुकसान झालं. तसंच बरेच लोक या पाण्यात वाहून गेले.These are the adverse effects of climate change; Shocking revelation of American researchers; Increase in future natural disasters like Chamoli

संपूर्ण देशभरात या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. उत्तराखंडमधील हिमकडा कशामुळे कोसळला?, याबद्दलचा खळबळजनक दावा अमेरिकेच्या संशोधकांनी केला आहे.

अमेरिकन जिओफिजिकल युनियनच्या शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, हजारो टन खडक आणि लाखो टन बर्फ सतत दोन किलोमीटरपर्यंत खाली पडल्यामुळे तापमानात वेगाने वाढ झाली आणि वाढत्या तापमानामुळे बर्फ लगोलग वितळला. बर्फ वितळल्याने अचानक मोठा जलप्रलय आला.ज्या प्रकारे जगभरात वातावरणात बदल होत आहेत. तसंच आपण वातावरणातील बदलांमुळे दुष्परिणाम पाहतो आहोत. अशा परिस्थितीत भविष्यात चमोलीसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होईल, त्यासाठी जगातील सर्व देशांनी केवळ जागरूक राहण्याची गरज आहे. तसंच अधिक मॉनिटरिंगचीही आवश्यकता आहे.

चमोलीच्या आपत्तीबद्दल वाडिया हिमालयन भूविज्ञान संस्था, इस्रो, डीआरडीओ, देशाच्या विविध संशोधन संस्थाबरोबरच युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानसह विविध देशांतील शास्त्रज्ञांच्या पथके संशोधन करत आहेत.

अमेरिकन जिओफिजिकल युनियनच्या शास्त्रज्ञांनी घटना घडल्यानंतर केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने ज्या त्वरेने पीडितांना मदत केली तसंच रेस्क्यू ऑपरेशन केलं त्याचं कौतुक केलं आहे. अशा प्रकारच्या आपत्तीमध्ये लोकांना असंच सहकार्य आणि मदत हवी असते, असं म्हणत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कामाचं कौतुक अमेरिकन जिओफिजिकल युनियनच्या शास्त्रज्ञांनी केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडच्या जोशीमठात हिमस्खलन झाल्यानं धरण फुटले. यामुळे पाण्याचा प्रवाह खूप वेगवान झाला आणि पाणी वेगाने खाली येऊ लागले. या पाण्यात अनेक लोक वाहून गेले. हा अपघात तपोवनच्या वरच्या ‘धौली गंगा’ नदीवर झालाय. हिमनगाचा एक मोठा भाग पर्वतावरून खाली आला, ज्यामुळे धरण फुटले आणि नदीच्या पाण्याचा प्रवाह खूप वेगवान झाला.

These are the adverse effects of climate change; Shocking revelation of American researchers; Increase in future natural disasters like Chamoli

हिमनग हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या बर्फाचा एक तुकडा असतो आणि तो बराच मोठा असतो. वास्तविक, जेथे तापमान खूप कमी असते, तेथे सतत बर्फवृष्टी झाल्यास बर्फ जमा होतो आणि त्या तुलनेत बर्फ वितळत नाही. अशा परिस्थितीत बर्फाचा एक जाड थर पाण्यावर जमा होतो, ज्याला ग्लेशियर म्हणतात. कालांतरानं हा बर्फाचा जाड थर पाण्याच्या प्रवाहासह कमी सखल भागात वाहतो.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*