कोरोनाचा असाही इफेक्ट… अर्थसंकल्प कागदावर छापणार नाही, तर डिजिटली सादर होणार; पारंपरिक हलवा कार्यक्रमही यंदा नाही


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या संकटाला तोंड देण्यासाठी लस आली असताना यंदाच्या अर्थसंकल्पात कोरोना फाइटसाठी काय तरतुदी असतील, याची उत्सुकता आहे. पण त्यापेक्षा वेगळ्या कारणासाठी देखील यंदाचा अर्थसंकल्प आतापासूनच चर्चेत आहे, कारण तो छापलाच जाणार नाहीए… थांबा तो सादर होणार नाही, असे म्हटलेले नाही… तो छापला जाणार नाही, एवढेच म्हटले आहे. त्याचबरोबर अर्थमंत्रालयातील कर्मचारी यंदा पारंपारिक हलवा कार्यक्रमालाही मुकणार आहेत… कोरोनाचा हा इफेक्ट आहे. there will be no budget papers, 2021 – 22 central budget will be presented digitally

2021 – २२ या आर्थिक वर्षातील छापला न जाणारा पण डिजिटली सादर होणारा स्वतंत्र भारतातला पहिला अर्थसंकल्प असेल. कोविड 19 च्या महामारीमुळं यंदा अर्थसंकल्पीय कागदपत्र छापली जाणार नाहीत. अर्थसंकल्प छापण्यासाठी दिवसरात्र छपाई कामासाठी प्रेसमध्ये एकाच वेळी 100 जणांना कामासाठी एकाच ठिकाणी ठेवण्यात येणार नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

अर्थमंत्रालयाशी संलग्न वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार अर्थसंकल्पाच्या सॉफ्ट कॉपी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 1 फेब्रुवारी 2021ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारीदरम्यान पार पडणार आहे. तर, दुसरा टप्पा 8 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संससदेच्या दोन्ही सदनांना एकत्रित संबोधित केल्यानंतर 29 जानेवारीला लोकसभेत आर्थिक विश्लेषण अहवाल सादर केला जाईल. ज्यामध्ये मागील वर्षभरात आर्थिक क्षेत्रातील देशाची प्रगती आणि अर्थसंकल्पातील संभाव्य माहिती संक्षिप्त स्वरुपात मांडलेली असेल. अर्थमंत्रालयाकडून हा अहवाल सादर करण्यात येईल.

there will be no budget papers, 2021 – 22 central budget will be presented digitally

कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळणार

अर्थसंकल्प सादर करतेवेळी अर्थसंकल्पीय सत्रादरम्यान, कोरोनाच्या सर्व निर्बंधांचं पालन करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पावसाळी अधिवेशनाप्रमाणं दोन सत्रांमध्ये हे सादरीकरण पार पडेल. सकाळ आणि सायंकाळ अशा दोन वेळा त्यासाठी निर्धारित करण्यात येतील. ज्यामध्ये प्रत्येक सदन एका शिफ्टमध्ये दोन्ही सदनांच्या जागेतील आसन व्यवस्थेवर बसू शकेल.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था