आईपेक्षा श्रेष्ठ कुणी नाही आणि जो मुलगा आपल्या आईवर हात उचलतो, तो माणूस होऊच शकत नाही ; हरभजन सिंगने व्यक्त केला संताप

दिल्लीतील धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि अनेकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंगने बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पोस्ट करून भज्जीनं दिल्ली पोलीस व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. There is no one better than a mother and a child who raises his hand against his mother

या व्हिडीओत एका मुलानं त्याच्या आईला कानाखाली मारली आणि त्यानंतर त्या वृद्ध महिलेचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

भज्जी प्रचंड रागात होता आणि त्यानं पोस्टवर लिहिले की,”आईपेक्षा श्रेष्ठ कुणी नाही आणि जो मुलगा आपल्या आईवर हात उचलतो, तो माणूस होऊच शकत नाही. हा व्हिडीओ पाहून दुखी झालो. अशा मुलाला जगण्याचा अधिकार नाही. दिल्ली पोलीस व मुख्यंमत्री केजरीवाल यांनी या घटनेची दखल घेऊन लगेच कारवाई करावी.”

भारताचा माजी गोलंदाज रुद्रप्रताप सिंग यानंही निषेध व्यक्त केला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ दिल्ली येथील द्वारकामधील बिंदापूर भागातला आहे. जिथे रणवीर नावाच्या एका व्यक्तीनं त्याच्या वृद्ध आईला कानाखाली मारली. त्यानंतर त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आणि तिथे तिचा मृत्यू झाला. अवतार कौर असं या महिलेचं नाव असून त्या 76 वर्षांच्या होत्या.

There is no one better than a mother and a child who raises his hand against his mother

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*