वृत्तसंस्था
मुंबई : ख्यातनाम दिवंगत पार्श्वगायक किशोर कुमार यांच्या घरातून एका नोकराने चोरी केली होती. त्याला उत्तरप्रदेशातून पोलिसांनी अटक केली. Theft at Kishore Kumar’s house
किशोरकुमार यांची नात सांताक्रूझ येथील घरात राहते. त्यांचा नोकर हरनारायण दुर्गा यादव हा चोरी करून पळून गेला होता. तो बॅग घेऊन जात असल्याचे सुरक्षारक्षकाला दिसले. त्यांनी किशोरकुमार यांच्या नातीला ही माहिती दिली. त्यांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी त्याचा माग काढला. तेव्हा तो उत्तरप्रदेशातील बांदा रेल्वे स्टेशनवर उभा असलेला आढळला. त्याला अटक केली आहे. दरम्यान त्याला न्यायालयाने जमीन मंजूर केला.